AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashwini Vaishnaw: रेल्वेचे ऑनलाइन तिकीट काऊंटर तिकिटापेक्षा महाग का? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले हे कारण

railway online ticket booking: आयआरसीटीसीला ऑनलाइन तिकीट सुविधा प्रदान करण्यासाठी खूप खर्च करावे लागते. तसेच तिकीट सुविधांची देखभाल, अपग्रेडेशन आणि विस्तारासाठी आयआरसीटीसीकडून सुविधा शुल्क घेतले जाते.

Ashwini Vaishnaw: रेल्वेचे ऑनलाइन तिकीट काऊंटर तिकिटापेक्षा महाग का? रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले हे कारण
ashwini vaishnaw
| Updated on: Feb 08, 2025 | 4:32 PM
Share

IRCTC Railway Online Ticket Booking: रेल्वे तिकीट ऑनलाईन अन् ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने काढण्यात येते. रेल्वे काऊंटरवर म्हणजेच ऑफलाईन तिकिटापेक्षा ऑनलाईन तिकिटांची किंमत जास्त असते. यासंदर्भात राज्यसभेत शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न विचारला. त्याला रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले. ऑनलाईन तिकिटास सुविधा शुल्क आणि ट्राजँक्‍शन शुल्क लागत असल्यामुळे ते महाग असल्याचे रेल्वे मंत्र्यांनी सांगितले.

राज्यसभेत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वेची ऑनलाईन तिकीटे आयआरसीटीसी (IRCTC) मार्फत बुक केली जातात. त्यासाठी सुविधा शुल्क आणि ट्राजँक्शन शुल्क लागते. त्यामुळे रेल्वे काऊंटरपेक्षा ऑनलाईन तिकीट बुक केल्यावर जास्त पैसे लागत असतात. IRCTC ऑनलाइन तिकिटासाठी खूप खर्च करावा लागतो. त्यासाठी सुविधा शुल्क घेतले जाते. हा पैसा सिस्टमची देखभाल दुरुस्ती, अपग्रेडेशन आणि विस्तारासाठी वापरला जातो. तसेच ग्राहकांना बँकांचे शुल्कही ऑनलाईन तिकिटासाठी द्यावे लागत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले.

ऑनलाईन तिकिटावर कोणकोणते शुल्क

आयआरसीटीसी रेल्वेची ऑनलाईन तिकीट सेवा प्रदान करणारी संस्था आहे. लोकांना घरी बसून तिकीट बुक करण्याची सुविधा आयआरसीटीसीकडून दिली जाते. त्यासाठी काही अतिरिक्त शुल्क आरआरसीटीसीकडून घेतले जाते. हे शुल्क दोन प्रकारचे आहे. त्यात सुविधा शुल्क आणि ट्राजँक्शन शुल्क आहे. सुविधा शुल्क आपल्या सेवांच्या मोबदल्यात आयआरसीटीसीकडून घेतले जाते. हा पैसा ऑनलाईन प्रणाली अधिक चांगली करण्यासाठी वापरला जातो. ट्राजँक्शन शुल्क बँके ऑनलाइन पेमेंट प्रक्रियेसाठी घेतले जाते.

80% तिकिटांची विक्री ऑनलाईन पद्धतीने

रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार, आयआरसीटीसीला ऑनलाइन तिकीट सुविधा प्रदान करण्यासाठी खूप खर्च करावे लागते. तसेच तिकीट सुविधांची देखभाल, अपग्रेडेशन आणि विस्तारासाठी आयआरसीटीसीकडून सुविधा शुल्क घेतले जाते. याशिवाय ग्राहक बँकांना व्यवहार शुल्कही भरतात. आता रेल्वेची 80% पेक्षा जास्त आरक्षित तिकिटे ऑनलाइन बुक केली जात आहेत. यावरून ऑनलाइन सुविधांचा वाढता वापर दिसून येतो. ऑनलाइन बुकिंगमुळे प्रवाशांना तिकीट बुक करण्यासाठी आरक्षण काउंटरवर जाण्याच्या त्रासापासून सुटका मिळते आणि प्रवासाचा वेळ आणि वाहतूक खर्चही वाचतो.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.