Monsson Rain : मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढला, राज्यात काय राहणार स्थिती..?

| Updated on: Aug 08, 2022 | 6:38 PM

जुलै महिनाभर बरसलेला पाऊस ऑगस्टमध्ये उसंत घेणार की काय अशी स्थिती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झाली होती. पण पुन्हा आंध्र प्रदेशातील किनारी भाग आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांमध्ये मुंबई, उपनगरांसह कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Monsson Rain : मुंबई उपनगरात पावसाचा जोर वाढला, राज्यात काय राहणार स्थिती..?
राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
Follow us on

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसामध्ये केवळ सातत्य होते. पण आता (Monsoon Rain) मान्सून आपली कूस बदलत आहे. रिमझिम पावसाचे रुपांतर आता मुसधार धारांमध्ये होऊ लागले आहे. (Mumbai) मुंबई शहर आणि उपनगरात रिमझिम पावसाची हजेरी होती पण त्यानंतर आता पावसाचा जोर वाढत आहे. मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरातील भागात रविवारी रात्रीपासूनच मुसळधार पावसाला सुरवात झाली होती ती सोमवारी सकाळपर्यंत कायम होती. ऑगस्ट महिन्यात सरासरीप्रमाणे पाऊस बरसणार असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला होता. पण दुसऱ्या आठवड्यापासून मान्सूनने पुन्हा आपला लहरीपणा दाखवण्यास सुरवात केली आहे. मुंबई उपनगराप्रमाणेच कोकण, घाटामाथा आणि मराठवाड्यातील पावसामध्ये सातत्य कायम आहे.

दोन दिवस मुसळधार सरी बरसणार

जुलै महिनाभर बरसलेला पाऊस ऑगस्टमध्ये उसंत घेणार की काय अशी स्थिती ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झाली होती. पण पुन्हा आंध्र प्रदेशातील किनारी भाग आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे आगामी दोन दिवसांमध्ये मुंबई, उपनगरांसह कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शिवाय याच भागात अतिवृष्टी होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.

राज्यातील या भागात अधिकचा पाऊस

हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यामध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामध्ये मुंबईसह उपनगरांचा तप समावेश आहेच पण कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कायम राहणार आहे. हंगामाच्या सुरवातीपासून कोकण, मुंबई आणि विदर्भात पावसाने हजेरी लावलेली आहे. पण आता मान्सून राज्यात सक्रीय झाला असून तो धो-धो बरसतही आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही नागरिकांना अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे.

खरीप पिके पाण्यातच

दरवर्षी पाण्याविना कोमजणारी पिके यंदा उगवण झाल्यापासून पाण्यातच आहेत. त्यामुळे खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग पिकांची वाढ तर खुंटलेली आहेच पण आता अधिकच्या पावसाचा परिणाम उत्पादनावरही होणार अशी स्थिती आहे. सोयाबीन हे खरिपातील हुकमी पीक असून ते देखील पाण्यात आहे. त्यामुळे अधिकचे उत्पन्न तर नाही पण किमान पेरणीसाठी झालेला खर्च तरी पदरी पडावा अशी माफक अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.