AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ram Mandir : राम मंदिरात लोकांचं भरभरुन दान, नोटा मोजण्यासाठी बसवल्या मशीन

Ram Mandir : राम मंदिराचे उद्घाटन झाल्यापासून आतापर्यंत एका महिन्यात जवळपास ६० लाख लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. दररोज येणाऱ्या भाविकांची संख्या वाढतच आहे. रामनवमीच्या दिवशी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आतापासूनच प्रशासन तयारीला लागले आहे.

Ram Mandir : राम मंदिरात लोकांचं भरभरुन दान, नोटा मोजण्यासाठी बसवल्या मशीन
| Updated on: Feb 24, 2024 | 8:34 PM
Share

Ayodhya ram mandir : अयोध्येत राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर प्रभू रामाच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक येत आहेत. रामलल्ला मंदिरात विराजमान झाल्यापासून आतापर्यंत लाखो लोकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. देश-विदेशातून भाविक दर्शनाला येत आहेत. मंदिरात इतके दान येत आहे की, आता बँक कर्मचारी आणि नोटा मोजण्यासाठी हायटेक मशीन बसवण्यात आल्या आहेत. मंदिरात सहा हुंड्या ठेवण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये दररोज लाखो रुपये दान स्वरुपात येत आहेत.

10 काउंटर, 6 दानपेट्या

राम मंदिरात ६ मोठ्या दानपेट्या ठेवण्यात आल्या आहेत. तर मंदिर परिसरात 10 डोनेशन काउंटरही उभारण्यात आले आहेत. जेथे भाविक देणगी देत आहेत. रामभक्त आपल्या सोयीनुसार दानपेटीत दान करत आहेत. एका महिन्यात 25 किलो सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह सुमारे 25 कोटी रुपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत.

भव्य राम मंदिराचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आले होते. तेव्हापासून लाखो रामभक्त अयोध्येत पोहोचले आहेत. भव्य मंदिर उभारणीसाठीही लोकांनी मोठे दान दिले होते. आता देखील लोकांकडून मोठ्या प्रमाणात दान येत आहे. दररोज लाखो रुपये दानपेटीत टाकले जात आहेत. हे पैसे मोजण्यासाठी राम मंदिर ट्रस्टने हायटेक मशीन्स बसवल्या आहेत.

दररोज लाखो रुपयांची देणगी

राम मंदिर ट्रस्टचे प्रभारी प्रकाश गुप्ता यांनी म्हटले की, रामल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यापासून अयोध्येत रामभक्तांची एवढी मोठी गर्दी होत आहे की कोणी कल्पनाही केली नसेल. राम भक्त दर्शनासाठी येत आहेत आणि मंदिरासाठी दान देखील देत आहेत. दानपेटीत 10 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंतच्या नोटा दान करत आहेत. दररोज इतके दान येत आहे की, ट्रस्टच्या कर्मचाऱ्यांसह बँक कर्मचाऱ्यांनाही नोटा मोजण्यासाठी तैनात करावे लागले आहे.

आतापर्यंत 60 लाख भाविकांनी दर्शन

23 जानेवारीपासून आजपर्यंत सुमारे 60 लाख भाविकांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. मंदिर ट्रस्टला रामनवमी उत्सवादरम्यान देणग्यांमध्ये वाढ होण्याची अपेक्षा आहे.  त्या वेळी सुमारे 50 लाख भाविक अयोध्येला येण्याची शक्यता आहे. गुप्ता यांच्या माहितीनुसार, रामनवमीच्या वेळी देणगीच्या रूपात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम मिळण्याची अपेक्षा आहे, त्या दृष्टीने स्टेट बँक ऑफ इंडियाने रामजन्मभूमीवर चार स्वयंचलित मोजणी यंत्रे बसवली आहेत. लवकरच एक मोठा आणि सुसज्ज मोजणी कक्ष राम मंदिर संकुलात बांधला जाईल.”

शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला
शिवाजी पार्कात प्रजासत्ताक दिनाचा दिमाखदार सोहळा पार पडला.
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे
सत्ता, संघर्ष, राजकारणापेक्षा देश महत्वाचा; एकनाथ शिंदे.
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन
राज्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ध्वजवंदन.
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा
विकसित भारताचा संकल्प दृढ होवो; पंतप्रधानांकडून देशवासीयांना शुभेच्छा.
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस
समाज घडवण्यात गुरू तेग बहादुर यांचे मोलाचे योगदान - फडणवीस.
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते
शिंदे सेना गद्दारांची टोळी, आणि ही टोळी भाजप चालवते.
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!
विरुद्ध दिशेनं गाडी की घातली? जाब विचारणाऱ्या वाहतूक पोलिसाला मारहाण!.
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली
पवारांवर टीका करताना शिवतारेंची जीभ घसरली.
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा
केंद्र सरकारकडून 2026 च्या पद्म पुरस्कारांची घोषणा.
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई
कराडमध्ये ड्रग्जप्रकरणी डीआरआयची मोठी कारवाई.