AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्रीराम मंदिर, योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, ईमेलमध्ये म्हटले…

ayodhya ram-temple | अयोध्येत श्रीराम मंदिर सोहळ्याचा प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरु असताना धमकीचा ईमेल आला आहे. श्रीराम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश एटीएस प्रमुख अमिताभ यश यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिली आहे.

श्रीराम मंदिर, योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवण्याची धमकी, ईमेलमध्ये म्हटले...
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 01, 2024 | 8:00 AM
Share

मुंबई, दि. 1 जानेवारी 2024 | अयोध्येत श्रीराम मंदिर सोहळ्याचा प्राण प्रतिष्ठा सोहळा २२ जानेवारी रोजी होणार आहे. या सोहळ्याची जोरदार तयारी अयोध्येत सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या रेल्वे स्टेशन आणि विमानतळाचे दोन दिवसांपूर्वी लोकार्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्या संपल्यानंतर अयोध्येतील श्रीराम मंदिर बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तर प्रदेश एटीएस प्रमुख अमिताभ यश यांनाही ठार मारण्यात येणार असल्याचे धमकीचा ईमेलमध्ये म्हटले आहे. धमकी देणारा स्वत:ला आयएसआयशी संबंधित असल्याचा दावा करत आहे. भारतीय किसान मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष देवेंद्र तिवारी यांना हा मेल पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास सुरु करण्यात आला आहे.

कोणी पाठवला ईमेल

भारतीय किसान मंच आणि राष्ट्रीय गौ परिषदेचे कार्यकर्ते असलेल्या देवेंद्र तिवारी यांना हा मेल आहे. या मेलमध्ये आक्षेपार्ह शब्दाचा वापर करण्यात आला आहे. ईमेल पाठवणारा व्यक्तीने स्वत:चे नाव जुबेर हुसैन खान असल्याचे म्हटले आहे. आपण आयएसआयशी संबंधित असल्याचा दावा त्याने केला आहे. यासंदर्भात देवेंद्र तिवारी यांनी आपल्या एक्स (ट्विटर) अकाउंटवर माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, श्रीराम मंदिर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, एसटीएफचे प्रमुख अमिताभ यश आणि मला जुबेर खान नावाच्या व्यक्तीने ठार मारण्याची धमकी दिली आहे.

काय म्हणतात देवेंद्र तिवारी

देवेंद्र तिवारी यांनी म्हटले आहे की, आपण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानंतर आपल्या सुरक्षेबाबत काहीच उपाययोजना करण्यात आली नाही. यामुळे गौसेवेच्या नावावर आपण शहीद होऊ शकतो. दरम्यान या प्रकरणाचा तपास लखनऊ एटीएसकडून सुरु करण्यात आला आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असताना हा धमकीचा मेल आला आहे. यामुळे उत्तर प्रदेश पोलिसांसमोर आव्हान उभे राहिले आहे.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली