AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayodhya Diwali: अयोध्येत 500 वर्षांनंतर अशी दिवाळी…, 28 लाख दीपोत्सवाने सजणार घाट, असे असतील सर्व कार्यक्रम

ayodhya diwali 2024: अयोध्येतील उत्सावाच्या वातावरणात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहे. अयोध्येतील 17 मार्ग सामान्य जनतेसाठी बंद केले आहे.

Ayodhya Diwali: अयोध्येत 500 वर्षांनंतर अशी दिवाळी..., 28 लाख दीपोत्सवाने सजणार घाट, असे असतील सर्व कार्यक्रम
| Updated on: Oct 30, 2024 | 10:54 AM
Share

Ayodhya Ram Temple Diwali: अयोध्येतील राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाल्यानंतर पहिली दिवाळी साजरी होणार आहे. 500 वर्षांनंतर अयोध्येत अशी दिवाळी होणार आहे. 500 वर्षांनंतर होणाऱ्या राम दिवाळीसाठी अयोध्यानगरी नटून थटून तयार आहे. आज दीपोत्सव सुरु होणार आहे. त्यानंतर भगवंताचे पुष्पक विमानाने आगमन साकरण्यात येणार आहे.

अयोध्येतील रस्ते दिवाळीमुळे सजले आहेत. शहरातील गल्लीबोळपासून शरयू नदीतील घाटापर्यंत सर्वत्र झगमगाट आहे. बुधवारी 28 लाख दिव्यांनी सर्व घाट झगमगणार आहे. तसेच सातव्यांदा गिनीज वर्ल्ड रिकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार आहे.

Ayodhya Diwali

अयोध्या नगरीत भगवान रामचे चरित्र दाखवणारी देखावे साकारण्यात येणार आहे. पर्यटन विभागाने अयोध्येच्या सुशोभिकरणाची जबाबदारी एजन्सींवर सोपवली आहे. यावेळी अयोध्येत प्रदूषणमुक्त हरित फटाके फोडण्यात येणार आहे. हा एक नवीन आदर्श निर्माण होणार आहे.

अयोध्येतील पर्यावरणाला हानी न पोहोचवणारे फटके फोडण्यात येणार आहे. हे फटाके 120 ते 600 फूट उंचीवर आकाशात विखुरणार आहेत. पाच किलोमीटरच्या परिघातील लोकांना हे दृश्य सहज पाहता येणार आहे. सरयू नदीच्या पुलावर संध्याकाळी फटाक्यांसह लेझर शो, फ्लेम शो आणि संगीताचे सादरीकरण केले जाणार आहे.

रामकथा पार्कजवळील हेलिपॅडवर भारत मिलाप कार्यक्रम होणार आहे. प्रभू राम, लक्ष्मण आणि माता जानकी पुष्पक विमानाने या ठिकाणी येणार आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर रामकथा पार्कवर प्रभू रामाचा राज्याभिषेक होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत सरयू नदीच्या काठावर 1,100 लोक विशेष ‘आरती’ करतील.

राम की पॅडी, भजन संध्या स्थळ, चौधरी चरण सिंह घाटावर 28 लाख दिवे लावण्यात येणार आहे. त्यात 25 लाख प्रज्ज्वलित दिव्यांचा जागतिक विक्रम होणार आहे. त्यासाठी गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड्सचे सल्लागार निश्चल बारोट यांच्या नेतृत्वाखाली 30 सदस्यांची टीम आली आहे. ही टीम 55 घाटांवर ड्रोनच्या मदतीने दिव्यांजी मोजणी करत आहेत.

अयोध्येतील उत्सावाच्या वातावरणात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सुरक्षा व्यवस्था कठोर करण्यात आली आहे. संपूर्ण शहरात ठिकठिकाणी सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहे. अयोध्येतील 17 मार्ग सामान्य जनतेसाठी बंद केले आहे. या ठिकाणी फक्त पास धारकांनाच प्रवेश देण्यात येत आहे. शहरात 10,000 सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहे. त्यात अनेक जण साध्या गणवेशात आहेत.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.