Ram Mandir | रामलल्लाचा पहिला फोटो, मंदिराच्या गर्भगृहातून झलक

Ayodhya Ram Temple | रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक प्रथमच समोर आली. मुख्य राम मंदिरातील गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Ram Mandir | रामलल्लाचा पहिला फोटो, मंदिराच्या गर्भगृहातून झलक
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 9:45 AM

अयोध्या, दि.19 जानेवारी 2024 | अयोध्येत रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी १६ जानेवारीपासून विधी सुरु झाला आहे. २२ जानेवारी रोजी राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मंदिरात गुरुवारी रामलल्लाची मूर्ती आणण्यात आली. चार तास ही पूजाविधी चालली. या रामलल्लाच्या मूर्तीची पहिली झलक प्रथमच समोर आली. गर्भगृहात आसनावर ही मूर्ती ठेवण्यात आली आहे. हा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. फोटोत बालकरुपातील रामलल्ला दिसत आहेत. कर्नाटकातील प्रसिद्ध मूर्तीकार अरुण योगीराज यांनी ही मूर्ती बनवली आहे. मूर्ती आता झाकून ठेवलेली आहे.

गर्भगृहातील पहिला फोटो

गुरुवार रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाले. यावेळी विविध प्रकारचे संस्कार आणि पूजन करण्यात आले. प्राणप्रतिष्ठेसाठी काशीवरुन आलेल्या पुरोहितांच्या टीमने विधी विधान केले. हा कार्यक्रम संपल्यानंतर गुरुवारी रात्री रामलल्लाची गर्भगृहातील पहिला फोटो समोर आला. फोटोमध्ये राम मंदिर कार्यात काम करणारे कामगार हाथ जोडून भगवान श्रीराम यांना नमस्कार करताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

कृष्णशिळेतून घडवलेली ही मूर्ती अरुण योगीराज यांनी तयार केली आहे. राम मंदिरासाठी एकाच वेळी तीन मूर्तीकार मूर्ती घडवण्याचे काम करत होते. त्यातील योगीराज यांची मूर्ती गर्भगृहात ठेवण्याचा निर्णय झाला. अरुण योगीराज यांचे वडील प्रसिद्ध मूर्तीकार होते. अरुण योगीराज यांच्या कलेचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कौतूक केले आहे. मूर्ती तयार करण्याचे काम सुरु असताना योगीराज यांनी मोबाइल हातात घेतला नाही. कुटुंबाशी त्या कालावधीत त्यांचे बोलणे होत नव्हते.

3.4 फूट उंच रामलल्लाचे आसन

रामलल्लाचे आसन 3.4 फूट उंच आहे. क्रेनच्या मदतीने रामलल्लाची मूर्ती राम मंदिर परिसरात आणली गेली. त्याचे काही फोटो समोर आले होते. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी त्याचे आसनही तयार केले गेले. रामलल्लाची मूर्ती आसनावर प्रतिष्ठापणा करण्यापूर्वी चार तासांपेक्षा जास्त वेळ लागला. मंत्रोच्चार विधी आणि पूजन विधी करुन भगवान राम यांना आसनावर विराजमान करण्यात आले. आता 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा होणार आहे.

हे ही वाचा

रामलल्लाची मूर्ती तयार होईपर्यंत फोन नाही, पत्नी, मुलांशी संवाद नाही, मूर्तीकार अरुण योगीराजची एकाग्रता अन् मेहनत

जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो...
जरांगेंविरोधातील पोस्ट भोवली, डॉक्टरचं तोंडच काळं; डॉक्टर म्हणतो....
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक
मुंबईतील हवा खराब, ऑक्टोबर हिट अन् धूरकट वातावरणासह पावसाचंही कमबॅक.
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'
फडणवीसांचा मविआला चिमटा, 'साथ है म्हणणारे आता म्हणताय, हम तुम्हारे..'.
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण
मिटकरी 'या' मतदारसंघातून विधानसभा लढणार? बॅनरबाजीनं चर्चांना उधाण.
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?
काकानं केलं पुतण्याचं कौतुक, अजितदादा रोहित पवारांबद्दल काय म्हणाले?.
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते...
निलेश राणेंना शिंदे गट घेणार की नाही? उदय सामंत यांना सवाल करताच ते....
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण
एसटी कर्मचाऱ्यांच्या PF, मेडिकल बिल, LIC त घोटाळा? पगारातून पैसे कट पण.
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?
ईईईईई..घाणेरडे कुठले? शौचालयात कप धुतले, जळगाव महापालिकेत चाललंय काय?.
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल
'गिरे तो भी टांग उपर', सामना अग्रलेखावरून उदय सामंत यांचा हल्लाबोल.
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्..
शिंदेंचं हरियाणातील विजयानंतर ट्विट, त्यांच्या स्वप्नांचा चुराडा अन्...