AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घटस्फोटप्रकरणी न्यायालयात गेलेल्या राणी साहेबांचा मोठा निर्णय, लवकरच राजकारणात एंट्री?

आमदार राजा भैय्या यांच्या पत्नी भानवी सिंह यांनी 'लवकरच मी मैदानात उतरणार आहे' असे म्हटले आहे. विशेष म्हणजे राणी साहेब भानवी सिंह यांनी पती आमदार राजा भैय्या यांच्यापासून घटस्फोट मिळावा यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

घटस्फोटप्रकरणी न्यायालयात गेलेल्या राणी साहेबांचा मोठा निर्णय, लवकरच राजकारणात एंट्री?
Raghuraj Pratap SinghImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 19, 2024 | 6:59 PM
Share

लोकसभेत मिळालेल्या अपयशानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे उतर प्रदेशमधील राजकारण तापले आहे. अशातच आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. जन सत्ता दल लोकतांत्रिक पक्षाचे कुंडा मतदार संघाचे आमदार रघुराज प्रताप सिंह उर्फ ​​राजा भैय्या यांच्या विरोधात त्यांच्या पत्नी राणी साहेब भानवी कुमारी सिंह यांनी न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. राजा भैया यांचा हा घटस्फोटाचा खटला सुरू असतानाच पत्नी भानवी सिंह यांनी X वर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यामुळे त्या लवकरच राजकीय क्षेत्रात उतरतील अशी अटकळ बांधली जात आहे.

राजा भैया आणि पत्नी भानवी सिंह यांच्यात घटस्फोटाचा खटला सुरू आहे. राणी साहेब भानवी सिंह यांनी दिल्लीच्या साकेत कोर्टात आपला जबाब नोंदवला. यावेळी भानवी सिंह यांनी आपल्या जबाबात गंभीर आरोप केले आहेत. राजा भैय्या यांचे अवैध संबंध होते. तसेच, त्याच्या छेडछाडी प्रकरणांना त्यांनी सतत विरोध केला होता. मात्र, या विरोधामुळे राजा भैय्या यांनी आधी तिला मारहाण केली. धमकावले आणि नंतर घटस्फोटासाठी दावा ठोकला, असे भानवी सिंह यांनी न्यायालयाला सांगितले.

राणी साहेब भानवी सिंह यांनी राजा भैय्या यांचे निकटवर्तीय आमदार अक्षय प्रताप सिंह गोपाल यांच्याविरुद्धही गंभीर आरोप केले आहेत. अक्षय प्रताप सिंह गोपाल यांनी बनावट मार्गाने आपली कंपनी ताब्यात घेतल्याचा आरोप करत त्यांनी त्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याच दरम्यान भानवी कुमारी सिंह यांनी X वर एक पोस्ट केली आहे.

राणी साहेब भानवी सिंह यांनी X वर “कधीकधी मला वाटते जेव्हा राजघराण्यातील महिलांना त्यांच्या सन्मान आणि प्रतिष्ठेच्या रक्षणासाठी खूप संघर्ष करावा लागतो. त्यांना सरकारकडे विनवणी करावी लागते. एक आमदार धमकीची भाषा करतो. त्यावेळी सामान्य महिला कसे जगू शकतात याचा अंदाज आहे. माझी वैयक्तिक लढाई मी नक्कीच लढेन. पण, महिलांच्या हितासाठी लढण्याचा संकल्प घेऊन मी लवकरच मैदानात उतरेन. योग्य वेळेची वाट पहा असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

Follow Us
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ...
संतोष देशमुख प्रकरणी सर्वात मोठी अपडेट! थेट साक्षीदारालाच...दोन भाऊ....
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक...
बापरे! सोसाट्याचा वारा अन् धुळीचं भीषण वादळ; निसर्गाचा भयानक....
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण
अंतरवालीत 6 तासांपासून रखरखत्या उन्हात मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण.
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना....
विधान परिषदेसाठी रस्सीखेच; गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना.....
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले...
प्राजक्त तनपूरे यांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश, थेट मंचावरून म्हणाले....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स....
तब्बल 1526 किलो विष, पुण्यातील दारुकांडाचं भिवंडी कनेक्शन; रेक्स.....
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत
भयंकर घातपात टळला! मुंबई टार्गेटवर, रक्तपात घडवण्याचा होता कट; दिल्लीत.
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक
शरद पवारांपुढे जाण्याची हिंमत नाही, राष्ट्रवादी सोडताच तनपुरे भावुक.
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?
भाजपमध्ये जाण्यापूर्वी तनपुरेंची सुप्रिया सुळेंशी गुप्त चर्चा?.
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश
भाजपचा मोठा गेम! शरदचंद्र पवार गटाचे प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेश.