9 आणि 10 जानेवारीला आकाशात दुर्मिळ दृष्य दिसणार, नक्की पाहा…

येत्या 9 आणि 10 जानेवारीला सूर्यास्तानंतर अंतराळात शनि, बुध आणि गुरु हे तिनही ग्रह एकत्र दिसणार आहेत.

9 आणि 10 जानेवारीला आकाशात दुर्मिळ दृष्य दिसणार, नक्की पाहा...
Follow us
| Updated on: Jan 08, 2021 | 1:01 PM

मुंबई : येणाऱ्या विकेंडला म्हणजेच 9 आणि 10 जानेवारीच्या रात्री आकाशात एक असं दृष्य दिसणार आहे (Conjunction Of Jupiter Saturn And Mercury) जे तुम्ही आजपर्यंत कुठेही पाहिलेलं नसेल. येत्या 9 आणि 10 जानेवारीला सूर्यास्तानंतर अंतराळात शनि, बुध आणि गुरु हे तिनही ग्रह एकत्र दिसणार आहेत (Conjunction Of Jupiter Saturn And Mercury).

हे दृष्य 8 आणि 11 जानेवारीलाही दिसणार आहे. पण, स्पष्टपणे हे 9 आणि 10 जानेवारीच्या रात्री दिसेल. नवं वर्ष 2021 मधील ही पहिली रोमांचक खगोलशास्त्रीय घटना असेल.

2020 मध्ये गुरु आणि शनिचं Great Conjunction

2020 मध्ये 21 डिसेंबरला गुरु आणि शनिच्या Great Conjunction ने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यादरम्यान, शनि (Saturn) आणि गुरु (Jupiter) अत्यंत जवळ आले होते. पण, या दोन ग्रहांमधील अंतर 73.5 कोटी किलोमीटर होतं. पण, तरीही आकाशात ते अत्यंत जवळ दिसत होते.

जगभरातील करोडो लोकांनी हा दुर्मिळ क्षण आपल्या डोळ्यात साठवलं. कारण, हा दुर्मिळ क्षण जवळपास 400 वर्षांनंतर पाहायला मिळणार आहे.

आता शनि, गुरु आणि बुध एकत्र दिसणार

यापूर्वी शनि आणि गुरुला इतकं जवळ 1623 मध्ये पाहिलं गेलं होतं. आता शनि आणि गुरु जरी दूर झाले असतील तरी आता बुध (Mercury) यांच्यामधे आला आहे. 9 आणि 10 जानेवारीला तिन्ही ग्रह एकत्र येऊन त्रिकोण बनवतील.

हे तीनही ग्रह चार दिवसांपर्यंत एकत्र त्रिकोण या आकारात दिसतील. तिन्ही ग्रह चार दिवसांपर्यंत एकमेकांच्या जवळ दिसतील. त्यानंतर 10 जानेवारीनंतर हे ग्रह एकमेकांपासून दूर होत जातील. सूर्यास्तानंतर हे दृष्य अनुभवू शकता.

Conjunction Of Jupiter Saturn And Mercury

संबंधित बातम्या :

सूर्याचे स्थान बदलणार, पाहा कोणत्या राशींवर ओढवणार संकट, नि कोणत्या राशी होणार मालामाल…

Surya Grahan 2020 : 14 डिसेंबरला सूर्यग्रहण, जाणून घ्या काही खास गोष्टी

Cold Moon | सरत्या वर्षाचा शेवटचा ‘फूल मून’ पाहण्याच्या संधी, जाणून घ्या का म्हटले जाते ‘कोल्ड मून’

Full Moon : अंतराळातून असा दिसतो चंद्र, इंटरनॅशनल स्पेस स्टेशननं शेअर केले काही फोटो

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.