RBI Interest Rate Hike : महागाईचा झटका निश्चित, आरबीआयनं रेपो रेट-सीआरआर वाढवला, घर, कारचा EMI वाढणार

गेल्या कित्तेक दिवसांपासून रेपो दर 4 टक्के होता. त्यात आता वाढ होणाराय. महागाई वाढत असल्यानं रिझर्व्ह बँकेवर व्याजदर वाढविण्यासाठी दबाव होता. खूप दिवसांनंतर बुधवारी अचानक रेपो रेट दर वाढविण्याचं जाहीर करण्यात आलंय. आता रेपो रेट 0.40 टक्क्यांवरून वाढून 4.4 टक्के झालाय.

RBI Interest Rate Hike : महागाईचा झटका निश्चित, आरबीआयनं रेपो रेट-सीआरआर वाढवला, घर, कारचा EMI वाढणार
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास.
Image Credit source: t v 9
गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

May 04, 2022 | 3:32 PM

मुंबई: महागाईने पोळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना खिशाला झळ पोहोचवणारी बातमी आहे. आरबीआयने आपल्या रेपो रेट दरात वाढ केली. आरबीआयने (RBI) रेपो रेट 0.40 टक्क्यावरून 4.40 टक्के केला आहे. त्यामुळे स्वस्तातील कर्जाचा काळही संपुष्टात आला आहे. रिझर्व्ह बँकेने (Reserve Bank) रेपो रेट वाढवल्याने आता सामान्यांचं ईएमआयही वाढणार आहे. त्यामुळे आधीच महागाईची मार आणि त्यात आता घर आणि कारच्या कर्जाचा ईएमआयही (EMI) वाढणार असल्याने सामान्य माणसांच्या तोंडचे पाणी पळणार आहे. देशवासीयांना महागाईचा झटका निश्चित बसणार आहे. आरबीआयनं रेपो रेट-सीआरआर वाढवला. त्यामुळं आता घर, कारचा EMI वाढणार आहे. खूप दिवसांनंतर रिझर्व्ह बँकेनं रेपो दर वाढविण्याच निर्णय घेतला.

शशिकांत दास यांनी जाहीर केला निर्णय

गेल्या कित्तेक दिवसांपासून रेपो दर 4 टक्के होता. त्यात आता वाढ होणाराय. महागाई वाढत असल्यानं रिझर्व्ह बँकेवर व्याजदर वाढविण्यासाठी दबाव होता. खूप दिवसांनंतर बुधवारी अचानक रेपो रेट दर वाढविण्याचं जाहीर करण्यात आलंय. आता रेपो रेट 0.40 टक्क्यांवरून वाढून 4.4 टक्के झालाय. रेपो रेट-सीआरआर वाढविण्याचा निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी जाहीर केला. या निर्णयामुळं सामान्य नागरिकांना महागाईचा मोठा झटका बसणार आहे. सामान्यांचं ईएमआय आधी येत होते, त्यात आता वाढ होणार आहे. आम आदमीला महागाईचा शॉक बसला आहे. EMI वाढणार असल्यानं त्यांना आता जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. RBI रेपोरेट वाढवला आहे. कर्ज महागणार आहे. घर असो की कार असो यांचा हप्ता वाढणार आहे.

बँकेचे कर्ज घेणाऱ्यांना बसेल फटका

रेपो रेट वाढणे याचा अर्थ बँकांना मिळणाऱ्या कर्जदरात वाढ होणे होय. आरबीआयनं रेपो दर वाढविल्यामुळं इतर बँकांना ग्राहकांना द्यावयाचे कर्जाचे दर वाढवावे लागतील. याचा फटका बँकेकडून घरासाठी कर्ज घेणारे, कारसाठी कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसेल. रिझर्व्ह बँकेने गेले काही दिवस व्याज दरात कोणताही बदल केला नव्हता. आता रेपो दरात वाढ केला. याचा फटका बँकेचे कर्ज घेणाऱ्या ग्राहकांना बसणार आहे.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें