AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Viral : रिक्षा चालकाची महिलेसोबत प्रायव्हेट पार्टवर अश्लील टिप्पणी, व्हिडीओ समोर येताच खळबळ

Video Viral : महिला रिक्षात बसताच चालकाने असं काही केलं, ज्यामुळे महिला तात्काळ रिक्षातून खाली उतरली. सध्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत असून, अनेकांनी संताप देखील व्यक्त केला आहे.

Video Viral : रिक्षा चालकाची महिलेसोबत प्रायव्हेट पार्टवर अश्लील टिप्पणी, व्हिडीओ समोर येताच खळबळ
| Updated on: Jun 08, 2026 | 10:17 AM
Share

Video Viral : महिलांची सुरक्षा खरंच वाऱ्यावर आहे… हे चित्र सतत दिसत येत असून फार भयानक आहे. आता देखील असंच काही झालं आहे. एका रिक्षा चालक प्रवासी महिलेला असं काही म्हणाला, ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. महिलेसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुंबईत प्रवासी महिलेसोबत रिक्षा चालकाने अश्लील कृत्य केलं आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रिक्षा चालक महिलेसोबत अत्यंत अशोभनीय आणि अश्लील बोलत आहे…

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, रिक्षा चालक महिलेसोबत स्वतःच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलत आहे. सर्वात आधी महिला रिक्षात बसते, त्यानंतर रिक्षा चालक महिलेसोबत अश्लील बोलण्यास सुरुवात करते. रिक्षा चालक जे म्हणाला ते इतके किळसवाणं आहे की त्याचे वर्णन करता येणार नाही. त्याच्या घाणेरड्या मानसिकतेने आणि उद्धट वागण्याने ती महिला इतकी घाबरली की ती लगेच रिक्षामधून उतरली.

रिक्षा चालकाचं अश्लील वर्णन कॅमेऱ्यात कैद

रिक्षा चालकाचं वर्तण पाहून महिला घाबरली. पण तिने मोठ्या हिंमतीने रिक्षा चालकाचा व्हिडीओ शूट केलं. सध्या व्हिडीओ सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल होत आहे. @th_anonymouse या एक्स हँडलवरून व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एवढंच नाही तर, व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ‘यावर मुंबई पोलीस कोणती कारवाई करणार का?’

व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांचा संताप

व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी तर संताप व्यक्त करत रिक्षा चालका विरोधात कडक कारवाई झालीच पाहिजे… अशी मागणी केली आहे. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ही हैराण करणारी घटना आहे… भारतातील मुंबई शहर महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वात सुरक्षित शहर म्हणून ओळखला जातो…’

दुसरा नेटकरी म्हणाला, ‘कोणतंच शहर आजच्या घडीला महिलांसाठी सुरक्षित नाही.’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘रिक्षा चालकाला परवाना कायमसाठी रद्द केला पाहिजे. आणि महाराष्ट्रातून त्याला बाहेर केलं पाहिजे…’, मिळत असलेल्या माहितीनुसार, पोलिसांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचला असून, पुढील तपास सुरु आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा