Valentines Day : शेकडो वर्षांपूर्वी जेव्हा भारतात तरुणी लाल गुलाब द्यायची तेव्हा त्याचा अर्थ काय होता? वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य
व्हॅलेंटाईन डेच्या आधी विविध प्रकारचे दिवस सेलिब्रेट केले जातात. रोज डे ने व्हॅलेंटाईन विकची सुरुवात होते. गुलाबाला प्रेमाचं प्रतिक मानलं जातं.

व्हॅलेंटाईन डेच्या आधी विविध प्रकारचे दिवस सेलिब्रेट केले जातात. शुक्रवारी रोज डे होता. व्हॅलेंटाईन विकची सुरुवातच रोज डे ने होते. म्हणजे आज वॅलेंटाईन विकचा तिसरा दिवस आहे. तुम्ही जर प्राचीन ग्रथांचा अभ्यास केला किंवा नाटकं पाहिली तर तुम्हाला असं दिसून येत की प्रेम या भावनेला भारतीय प्राचीन संस्कृतीमध्ये खूप महत्त्व होतं. प्रेम या विषयावर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात ग्रथंसंपदा उपलब्ध आहे. प्राचीन भारतातील परंपरा प्रेम, लग्न यासंदर्भात जगाच्या खूप पुढे होत्या. त्यांची वर्णनं आजही आपल्याला अनेक ग्रथांमध्ये ऐकायला, पाहायला मिळतात. प्राचीन भारतातील मुली लाल गुलाब देऊन आपलं प्रेम व्यक्त करत असत
कवी कालीदास यांच्या एका नाटकात या सर्व गोष्टींचं वर्णन केलं आहे. एक प्रेमिका वसंत ऋतुमध्ये कशापद्धतीनं आपल्या प्रेमीकडे गुलाबाचं फूल देऊन प्रेम व्यक्त करते? त्यावेळी तीच्या मनात जी घालमेल सुरू आहे, ती या नाटकातून मांडण्यात आली आहे.त्याही पुढे जाऊन अर्थवेदात असा उल्लेख आढळतो की त्या काळात तरुणीला आपला पती निवडण्याचं स्वातंत्र्य होतं. ती स्वत: आपल्या पतीची निवड करत असे.
व्हॅलेंटाईनची प्रथा युरोपमध्ये सुरू झाली, त्यानंतर त्याचा जगभरात प्रसार झाला, मात्र जेव्हा संपूर्ण जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. तेव्हा भारतामध्ये वसंत ऋतू असतो. वसंत ऋतू आणि प्रेमाचं अत्यंत जवळचं नात आहे. वसंत ऋतूचा संबंध थेट प्रेमाशी जोडला जातो.
असं मानलं जातं की कवी कालीदास यांचा जन्म ईसवीसन पूर्व 150 ते 600 वर्षादरम्यान झाला. कालिदास यांनी द्वितीय शुंग शासक अग्निमित्र याला कथेचा मुख्य नायक बनवून मालविकाग्निमित्रम् नाटक लिहील.अग्निमित्र याचा शासन काळ हा इसवीसनपूर्व 170 आसपास होता. या कथेत त्याने लिहीलं आहे की कशापद्धतीनं राजा अग्निमित्र याची प्रेयसी इरावती ही वसंत ऋतूमध्ये लाल गुलाबाचं फूल पाठवून अग्निमित्राजवळ आपली उत्कट प्रेमभावना व्यक्त करते, त्यामुळे भारतात प्राचिन काळापासून अशा पद्धतीनं लाला गुलाबाला प्रेमाचं प्रतीक मानलं जायचं हे समोर येतं.