AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohan Bhagwat : मंदिरापासून स्मशानापर्यंत सर्वांचा समान अधिकार पाहिजे – मोहन भागवत

Mohan Bhagwat : "राष्ट्राप्रती आपली जबाबदारी ओळखणारा समाजा असावा. पर्यावरणाला अनुकूल जीवन शैली स्वीकारली पाहिजे. जातीय विषमतेपासून मुक्त व्हा" असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालत मोहन भागवत म्हणाले.

Mohan Bhagwat : मंदिरापासून स्मशानापर्यंत सर्वांचा समान अधिकार पाहिजे - मोहन भागवत
RSS MOHAN BHAGWAT
| Updated on: Jun 09, 2025 | 8:45 AM
Share

“समाजाने जातीय भेदभाव मागे सोडून एका समरस सर्वसमावेशक राष्ट्राच्या दिशेने अग्रेसर झालं पाहिजे. संघाच कार्य व्यक्ती निर्माणाच आहे. व्यक्ती निर्माणातून कुटुंब, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण मानवतेप्रती उत्तदायित्वाची भावना जागृत होते” असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत रविवार स्वयंसेवकांशी संवाद साधताना म्हणाले. मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांकडून त्यांच्या भागात सुरु असलेल्या शाखा आणि सेवा कार्याची माहिती घेतली. “ज्या भागात शाखा आहे, त्या भागातील प्रत्येक कुटुंबाशी संघाचा संपर्क असला पाहिजे” असं मोहन भागवत म्हणाले. “आपण ‘वसुधैव कुटुम्बकम्’- विश्व एक परिवार आहे असं म्हणतो, याच भावनेतून संघाने आपल्या कार्याचा विस्तार समाज जीवनच्या विभिन्न क्षेत्रात केला आहे” असं मोहन भागवत म्हणाले.

“देशभरात लाखो सेवा कार्य संघ कार्यकर्ते आणि समाजाच्या सहकार्याने सुरु आहेत. जे समाजातील सकारात्मक परिवर्तनाच उदहारण आहे. वर्तमानात संघाने शताब्दी वर्षात प्रवेश केला आहे. ‘पंच परिवर्तना’च्या सिद्धांतावर कार्य करताना समाजाला जागरूक, उत्तरदायी आणि संवेदनशील बनवण्याच्या दिशेने अग्रेसर आहे” असं सरसंघचालकांनी सांगितलं.

जातीय विषमतेपासून मुक्त व्हा

“राष्ट्राप्रती आपली जबाबदारी ओळखणारा समाजा असावा. पर्यावरणाला अनुकूल जीवन शैली स्वीकारली पाहिजे. जातीय विषमतेपासून मुक्त व्हा. मंदिर, जलाशय आणि स्मशान अशा सार्वजनिक स्त्रोतांवर संपूर्ण समजाचा अधिकार असला पाहिजे. हीच खरी सामाजिक समरसता आहे” असे विचार मोहन भागवत यांनी व्यक्त केले.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.