AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघ प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली, आता मोदी अन् शाह यांच्यासारखी सुरक्षा, कारण…

RSS chief mohan bhagwat: काही राज्यांमध्ये गृह मंत्रालयला डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला. त्यानंतर नवीन सुरक्षा प्रोटोकॉल तयार केले गेले. त्यांची सुरक्षा मजबूत केली गेली. मोहन भागवत हे अनेक भारतविरोधी संघटनांच्या निशाण्यावर आहेत.

संघ प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली, आता मोदी अन् शाह यांच्यासारखी सुरक्षा, कारण...
mohan bhagwat
| Updated on: Aug 28, 2024 | 10:36 AM
Share

केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) चे प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवली आहे. त्यांना यापूर्वी झेड प्लस सुरक्षा आहे. परंतु आता त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याप्रमाणे झेड प्लस पेक्षा अधिक ASL (एडवांस्ड सिक्योरिटी लिएजॉन) सुरक्षा दिली गेली आहे. एएसएल सुरक्षा पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनाच दिली जाते. काही दिवसांपूर्वीच आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांची सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना आतापर्यंत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) ची झेड प्लस सुरक्षा होती.

मल्टी लेयर सुरक्षा प्रणाली

संघ प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांना सीआयएसएफची झेड प्लस सुरक्षा आहे. आता त्यांना मिळणाऱ्या एएसएल या वाढीव सुरक्षा यंत्रणेमध्ये देशातील कुठल्याही भागात स्थानिक प्रशासन, पोलीस, आरोग्य, अन्न व औषध प्रशासन यांचा समावेश असणार आहे. कुठलाही धोका टाळण्यासाठी मल्टी लेयर सुरक्षा यंत्रणा भागवत यांना पुरवण्यात येणार आहे.

कडक सुरक्षा प्रोटोकॉल

डॉक्टर मोहन भागवत यांच्या राहण्याच्या व्यवस्थेबाबत, प्रवास, भेटी आणि बैठकांच्या स्थळी अतिशय कडक सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यात येणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या दौऱ्यांच्या पूर्वी सर्व ठिकाणी फॉलोअप घेऊन एक दिवसापूर्वी त्यांचा आढावा घेण्यात येणार आहे.

का वाढवली सुरक्षा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही राज्यांमध्ये गृह मंत्रालयला डॉक्टर मोहन भागवत यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा दिसून आला. त्यानंतर नवीन सुरक्षा प्रोटोकॉल तयार केले गेले. त्यांची सुरक्षा मजबूत केली गेली. मोहन भागवत हे अनेक भारतविरोधी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. त्यांच्या सुरक्षेबाबत वाढत्या चिंता आणि विविध एजन्सींच्या इनपुटनंतर, गृह मंत्रालयाने भागवत यांना ASL सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेतला. वाढीव सुरक्षेबाबत माहिती सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना माहिती देण्यात आली आहे.

55 कमांडोकडून झेड प्लस होती

आरएसएस प्रमुखांना जून 2015 मध्ये सीआयएसएफच्या 55 कमांडोकडून झेड प्लस सुरक्षा मिळाली होती. यापूर्वी, यूपीए सरकारने 2012 मध्ये त्यांना झेड-प्लस सुरक्षा कवच प्रदान करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने कर्मचारी आणि वाहनांच्या कमतरतेचे कारण देत ही सुरक्षा प्रदान करण्यास असमर्थता दर्शवली होती. त्यावेळी सुशीलकुमार शिंदे गृहमंत्री होते. झेड प्लस सुरक्षा सर्वात महत्त्वाची मानली जाते. या सुरक्षेतील कमांडो 24 तास त्या व्यक्तीसोबत राहतात. सुरक्षेसाठी तैनात असलेले कमांडो NSG चे असतात.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.