AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सवर्ण आरक्षण देणारं गुजरात पहिलं राज्य ठरणार

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब सवर्णांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देणाऱ्या घटनादुरुस्ती विधेयकावर हस्ताक्षर करत या विधेयकाला मंजुरी दिली. त्यानंतर गुजरात सरकारने आपल्या राज्यात ही व्यवस्था लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गुजरात हे गरीब सवर्णांना आरक्षण देणारं भारतीय पहिलं राज्य ठरणार आहे. शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद […]

सवर्ण आरक्षण देणारं गुजरात पहिलं राज्य ठरणार
Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM
Share

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या गरीब सवर्णांना नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण देणाऱ्या घटनादुरुस्ती विधेयकावर हस्ताक्षर करत या विधेयकाला मंजुरी दिली. त्यानंतर गुजरात सरकारने आपल्या राज्यात ही व्यवस्था लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे गुजरात हे गरीब सवर्णांना आरक्षण देणारं भारतीय पहिलं राज्य ठरणार आहे. शनिवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या मंजुरीनंतर आता देशातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या सवर्णांना सरकारी नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षण मिळणार आहे.

केंद्र सरकारने या संबंधीत अधिसूचना जारी केली आहे. यानंतर लगेचेच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी रविवारी आपल्या राज्यात ही व्यवस्था लागू करण्याची घोषणा केली. आरक्षणाची ही नवी व्यवस्था गुजरातमध्ये सोमवारपासून लागू होणार आहे. एका आठवड्यात याचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल. सामाजिक न्याय विभाग एका आठवड्यात आरक्षणासंदर्भातील सर्व बाबी पूर्ण करणार आहे.

मोदी सरकारने सवर्ण विधेयक आणल्यानंतर लोकसभेत आणि राज्यसभेत ते मंजूर झालं. त्यानंतर राष्ट्रपतींनी देखील त्याला मंजुरी दिली. आता या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं आहे.

आर्थिक आरक्षण 8 लाख वार्षिक उत्पन्न आणि 5 एकरपेक्षा कमी जमीन असलेल्या सवर्णांना मिळू शकेल. ज्यांची संपत्ती निश्चित मर्यादेपेक्षा अधिक असेल, त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. मात्र ज्यांच्याकडे सरकारी जमिनीवर घर आहे, त्यांना या आरक्षणाचा लाभ मिळणार नाही.

या सर्वांना आरक्षणाचा लाभ मिळेल

• ज्यांचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे

• ज्यांच्याकडे 5 एकरपेक्षा कमी शेती आहे.

• ज्यांच्याकडे 1 हजार स्क्वेअर फुटापेक्षा लहान घर आहे

• ज्यांच्याकडे 109 गज पेक्षा कमी (सुमारे 430 चौ. फूट) अधिसूचित जमीन

• ज्यांच्याकडे महापालिकेची 209 गज विना अधिसूचित जमीन आहे संबंधित बातम्या :

आरक्षणासाठी घटनादुरुस्ती, मोदी सरकारला या भिंती पार कराव्या लागणार!

सवर्णातील गरीबांनाही आरक्षण, याच अधिवेशनात घटनादुरुस्तीची शक्यता

मोदी सरकारचा मोठा निर्णय, आर्थिक दुर्बल सवर्णांना 10 टक्के आरक्षण

8 लाखापर्यंतचं उत्पन्न, 5 एकरपेक्षा कमी जमीन, आरक्षणासाठी पात्रता

सवर्ण आरक्षण मिळण्यासाठी ही सात कागदपत्र आवश्यक

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ