AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी साहित्यातील ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीला ‘साहित्य अकादमी’, प्रवीण बांदेकरांचा होणार गौरव

मराठी साहित्यातील कादंबरीकार, कवी, प्रवीण दशरथ बांदेकर यांना यावर्षीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कादंबरीचा अकादमीच्या पुरस्काराने गौरव होणार आहे.

मराठी साहित्यातील 'उजव्या सोंडेच्या बाहुल्या' कादंबरीला 'साहित्य अकादमी', प्रवीण बांदेकरांचा होणार गौरव
| Updated on: Dec 22, 2022 | 6:53 PM
Share

नवी दिल्लीः साहित्य विश्वात मानाचा आणि प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या साहित्य अकादमीचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत. देशातील अनेक भाषांमध्ये दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या या पुरस्कारामध्ये मराठीतील कादंबरीकार आणि कवी प्रवीण बांदेकर यांच्या उजव्या सोंडेच्या बाहुल्या या कांदबरीला या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर कोकणी भाषेसाठी माया अनिल खर्नांगटे यांच्या अमृतवेल कादंबरीची या पुरस्कारासाठी निवड केली गेली आहे.

या पुरस्काराचे स्वरूप 1 लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य क्षेत्रात मानाचा समाजला जाणारा हा पुरस्कार साहित्य अक्षरोत्सवामध्ये प्रदान केला जातो.

साहित्य अकादमीच्या या वर्षीच्या या पुरस्कारामध्ये 7 कवितासंग्रह, 6 कादंबऱ्या, 2 कथासंग्रह, 3 नाटके, 2 टीकात्मक पुस्तके, प्रत्येकी 1 आत्मकथन, लेखसंग्रह व एतिहासिक कथासंग्रह या साहित्य प्रकारांची निवड केली गेली आहे. मराठी साहित्यातील ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे, ज्येष्ठ पत्रकार व खासदार कुमार केतकर आणि प्रा. नितीन रिंढे यांच्या या निवड समितीने या वर्षीच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे.

साहित्य अकादमीचे अध्यक्ष चंद्रशेखर कंबार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समितीची बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी 23 भाषांमधील साहित्यकृतींना अकादमीकडून गौरव करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अकादमीचे सचिव डॉ. के. श्रीनिवास राव यांनी सांगितले. साहित्य अकादमी पुरस्कार मिळवणारे प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत.

प्रा. प्रवीण दशरथ बांदेकर यांनी येरू म्हणे, चाळेगत, चिनभिन, इंडियन अॅनिमल फार्म, खेळखंडोबच्या नावानं या साहित्यकृतींचे त्यांनी लेखन केले आहे. त्यांच्या चाळेगत कादंबरीचीही मराठी साहित्यात जोरदार चर्चा झाली होती.

पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका
शिंदे साहेब जी जबाबदारी देतील, ती...; बांगर यांनी स्पष्ट केली भूमिका.
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?
नाशिकमध्ये भाजपविरोधात शिंदे शिवसेना, दादांची राष्ट्रवादी एकत्र?.
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.