AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सलमान खानसह ही 4 लोकं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?

मुंबईत बाबा सिद्दिका यांच्या हत्येनंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे, बाबा सिद्दिकी हे सलमान खानचे जवळचे मानले जात होते. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागचं कारण अजून समोर आलेलं नाही. पण लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. त्यांच्या हिटलिस्टवर आणखी पाच लोकं आहेत. ज्यामध्ये सलमान खानचं देखील नाव आहे.

सलमान खानसह ही 4 लोकं गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर?
| Updated on: Oct 14, 2024 | 3:59 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली आहे. तेव्हापासून तो पु्न्हा एकदा चर्चेत आला आहे. लॉरेन्स हा गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. पण तरी देखील तो त्यांचं नेटवर्क चावलत आहे. तो आपल्या शूटरच्या माध्यामातून हत्या घडवून आणत आहे. नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) अनेक प्रकरणांमध्ये लॉरेन्स बिश्नोईवर कडक कारवाईची तयारी केली आहे. एनआयएच्या चौकशीदरम्यान लॉरेन्सने त्याचे 5 टार्गेट कोण कोण आहेत याचा खुलासा केला होता. बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे नाव त्याच्या हिट लिस्टवर पहिल्या क्रमांकावर आहे.

सलमान खान

लॉरेन्स बिश्नोई याने एनआयएसमोर कबुली दिली होती की, सलमान खानला मारायचे आहे. त्यामागचे कारणही त्याने सांगितले होते. त्याने म्हटले होते की, काळवीट शिकार प्रकरणामुळे तो सलमान खानवर नाराज आहे. लॉरेन्सने जी कबुली दिली तेच त्याने घडवून आणले. सलमान खानवर हल्ला करण्यासाठी दोनदा रेकी करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्यांदा त्यांच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता.

लॉरेन्स बिश्नोईने सांगितले होते की, 1998 मध्ये सलमान खानने एका हम साथ साथ है सिनेमाच्या शूटिंगदरम्यान जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केली होती. बिष्णोई समाज हा काळ्या हरणाची पूजा करतो. पण सलमानने त्याची हत्या केल्याने त्याला मारणार असल्याचे त्याने म्हटले होते. आधी संपत नेहराने सलमान खानची रेकी केली. तो मुंबईत आला होता पण संपतला हरियाणा एसटीएफने अटक केली.

सगुनप्रीत सिंग

लॉरेन्सच्या हिट लिस्टवर असलेलं आणखी नाव म्हणजे सगुनप्रीत, पंजाबी गायक सिद्धू मूसावाला याचा तो मॅनेजर होता. लॉरेन्स बिश्नोईच्या जवळचा व्यक्ती विक्की मिड्डूखेडावर गोळीबार करणाऱ्या शुटर्सना त्याने आश्रय दिला होता. मोहालीत मिड्डूखेडाची हत्या झाली होती. लॉरेन्स गँग विकी मिड्डूखेडा यांना आपला भाऊ मानत होती. 2021 मध्ये मिड्डूखेडा यांची हत्या झाली होती.

गँगस्टर मनदीप धालीवाल

लॉरेन्सच्या हिटलिस्टमध्ये गँगस्टर मनदीप धालीवाल याचे देखील नाव आहे. धालीवाल हा बंबिहा टोळीचा म्होरक्या लकी पटियालच्या जवळचा व्यक्ती आहे. लॉरेन्स बिश्नोईने एनआयएला सांगितले होते की, त्याला मनदीपचा खून करायचा आहे. कारण त्याने विकी मिड्डूखेडाच्या मारेकऱ्यांना आश्रय देण्यातही मदत केली होती. त्याने आपल्या गँगचे नाव ‘ठग लाईफ’ असे ठेवले आहे. मनदीप लकी पटियालचा व्यवसाय सांभाळतो.

गँगस्टर कौशल चौधरी

कौशल चौधरी सध्या गुरुग्रामच्या तुरुंगात आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीचा तो कट्टर शत्रू आहे. बिश्नोईला त्याला मारायचे आहे. लॉरेन्सच्या कबुलीनुसार, कौशल चौधरीने विकी मिड्दुखेडा, भोलू शूटर, अनिल लठ आणि सनी लेफ्टी यांच्या मारेकऱ्यांनाही शस्त्रे पुरवली होती. कौशल चौधरी हा अतिशय कुख्यात गुंड मानला जातो.

अमित डागर

अमित डागर हा बंबीहा टोळीचा प्रमुख आहे. ही लॉरेन्स बिश्नोईची प्रतिस्पर्धी टोळी आहे. त्यांनी विकीच्या हत्येचा कट रचला होता. लकी पटियाल गँग माझी शत्रू असल्याचे लॉरेन्सने एनआयएला सांगितले होते. लकीच्या सांगण्यावरूनच माझा जवळचा मित्र आणि गोल्डीचा भाऊ गुरलाल ब्रारचा खून झाला. बंबीहा टोळीनेच विक्की मिड्डूखेडाच्या शूटर्स आणि रेकींना लपण्यासाठी मदत केली होती.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.