AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वंदे भारत सारख्याच सुविधा, पण भाडे कमी; पाहा अमृत भारतची वैशिष्ट्ये काय

देशात आता अनेक मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस सुरु झाल्या आहेत. वंदे भारतला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण आता भारतीय रेल्वे आणखी एक नवीन एक्सप्रेस आणणार आहे. अमृत भारत असे या नव्या गाडीचे नाव आहे. ३० डिसेंबर रोजी पहिली अमृत भारत धावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी याला हिरवा कंदिल दाखवणार आहेत.

वंदे भारत सारख्याच सुविधा, पण भाडे कमी; पाहा अमृत भारतची वैशिष्ट्ये काय
amrut bharat
| Updated on: Dec 25, 2023 | 9:10 PM
Share

Amrut Bharat Express : मोदी सरकारने रेल्वेचा विस्तार करण्यासाठी आणि नव्या रेल्वे सुरु करण्याचा धडाका लावला आहे. वंदे भारत हे त्याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. वंदे भारतला सगळीकडे चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही ट्रेन वेग आणि सुविधांमुळे पसंत केली जात आहे. या ट्रेनचे भाडे जास्त असल्याने गरीब लोक यातून प्रवास करु शकत नाही. येत्या काळात ते कमी होण्याची शक्यता आहे. पण त्याआधी भारतीय रेल्वेने वंदे भारत सारख्या वेगवान पण भाडे कमी असलेल्या नवीन गाड्या आणल्या आहेत. अमृत ​​भारत एक्सप्रेस असं या ट्रेनचे नाव आहे. या नव्या रेल्वे लवकरच धावताना दिसणार आहेत. या गाड्या भगव्या रंगाच्या आहेत.

2 अमृत भारत एक्सप्रेस 30 डिसेंबर रोजी सुरू होणार

वंदे भारत ट्रेन आणि अमृत भारत ट्रेनचा वेग सारखाच आहे. या नवीन गाड्या ताशी 130 किलोमीटर वेगाने धावतात. पंतप्रधान मोदी 30 डिसेंबर रोजी पहिल्या अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. ही अमृत भारत एक्सप्रेस अयोध्येला सीता मातेचे जन्मस्थान असलेल्या बिहारमधील सीतामढीशी जोडेल. या ट्रेनचा मार्ग बिहारमधील दरभंगा ते दिल्लीमार्गे अयोध्या असा असेल. पीएम मोदी 30 डिसेंबरलाच दुसर्‍या अमृत भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवतील. ही ट्रेन मालदा ते बंगळुरूला जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान मोदी 5 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.

अमृत ​​भारत एक्सप्रेसची वैशिष्टे

भगव्या रंगाच्या अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत. ही ट्रेन जी खूप लवकर वेग पकडते. या ट्रेनच्या दोन्ही बाजूला इंजिन आहेत. या ट्रेनमध्ये 22 डबे आहेत. या ट्रेनला स्लीपर आणि जनरल डबे आहेत. अमृत ​​भारत ट्रेनमध्ये 8 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील, ते अनारक्षित प्रवाशांसाठी असतील. 12 द्वितीय श्रेणीचे 3-स्तरीय स्लीपर कोच आणि 2 गार्ड कंपार्टमेंट असतील. या ट्रेनमध्ये एकूण 1800 प्रवासी प्रवास करू शकतील. ट्रेनमधील सुविधा वंदे भारतसारख्या आधुनिक आहेत. या ट्रेनमध्ये प्रवाशांना सीसीटीव्ही कॅमेरे, आधुनिक टॉयलेट्स, सेन्सर पाण्याचे नळ आणि उद्घोषणा यंत्रणाही मिळणार आहे.

वंदे भारत पेक्षा भाडे कमी

अमृत ​​भारत एक्सप्रेस ट्रेनचे भाडे वंदे भारत ट्रेनपेक्षा कमी असेल. अल्प उत्पन्न गटातील लोकांना डोळ्यासमोर ठेवून रेल्वेने या गाड्या बनवल्या आहेत. त्यामुळे त्याचे भाडे कमी ठेवण्यात आले आहे. मात्र, या ट्रेनमध्ये अनेक आधुनिक सुविधा आहेत.

5 नवीन वंदे भारत ट्रेनही सुरू होणार आहेत

30 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी 2 अमृत भारत एक्सप्रेस ट्रेन तसेच 5 वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. या 5 नवीन वंदे भारत ट्रेनमध्ये अयोध्या-आनंद विहार, नवी दिल्ली-वैष्णो देवी, अमृतसर-नवी दिल्ली, जालना-मुंबई आणि कोईम्बतूर-बंगळुरू वंदे भारत यांचा समावेश आहे.

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.