AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सरकारला एसआयटीमागे लावण्याची खाज, मग खोकेवाल्यांचीही एसआयटी चौकशी करा; संजय राऊत यांचा घणाघात

आज तेच धोरण सरकार आणत आहे. नाईट लाईफला विरोध करणारे आशिष शेलार आज कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या आमदारांनी आपली स्वत:ची वक्तव्ये काढून पाहावीत.

सरकारला एसआयटीमागे लावण्याची खाज, मग खोकेवाल्यांचीही एसआयटी चौकशी करा; संजय राऊत यांचा घणाघात
सरकारला एसआयटीमागे लावण्याची खाज, मग खोकेवाल्यांचीही एसआयटी चौकशी करा; संजय राऊत यांचा घणाघातImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Dec 24, 2022 | 10:30 AM
Share

नवी दिल्ली: महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. या सरकारला एसआयटी स्थापन करण्याची खाज आहे. एसआयटी मार्फत चौकशीच करायची असेल तर खोकेवाल्यांचीही चौकशी करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियााशी संवाद साधत होते.

राज्य सरकारने एसआयटीचं रेशनिंग केलं आहे. मागेल त्याला एसआयटी देण्यात येत आहे. महाराष्ट्रात एसआयटी स्थापन व्हायला पाहिजे. जे 40 आमदार ज्या पद्धतीने 50 खोके देऊन फोडण्यात आले. तो काय व्यवहार होता याची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

पण जे विषय संपले आहेत. जे विषय पोलीस आणि सीबीआयने संपवले आहेत, त्यावर एसआयटी स्थापन करून सत्तेचा आणि पोलीस यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. आम्ही सर्व तपासाला सामोरे जाऊ,. तुम्ही तोंडावर पडाल, असा इशाराच राऊत यांनी दिला.

सरकारपक्षातील अनेकांची प्रकरणे बाहेर पडली. त्याचाही तपास होईल. आम्ही दोन दिवस नागपूरला जात आहोत. अनेक प्रकरणं काढू. त्यावरही एसआयटी मागू. या सरकारला एसआयटी स्थापन करण्याची खाज आहे. खाजवत बसा, असा हल्ला त्यांनी चढवला.

एसआयटी ही अत्यंत महत्त्वाच्या अन्यनसाधारण प्रकरणात स्थापन केली जाते. पण सरकारने एसआयटी आणि पोलिसांचं महत्त्वं कमी केलं आहे,. ऊठसूठ एसआयटी स्थापन करायची, पोलिसांना काही कामच ठेवलं नाही, असा संताप त्यांनी व्यक्त केला.

जे विषय संपले त्यावर पुन्हा पुन्हा बोलायचं. विधानसभेत कोणीही उठतो आणि एसआयटीची मागणी करतो. दुसऱ्यांची अप्रतिष्ठा करण्याचे विषय काढले जात आहेत. बदनामीचं शस्त्र बाहेर काढलं जात आहे. पण आम्ही त्यातून बाहेर पडू. हे अग्निदिव्य आहे.

अशा अनेक अग्निदिव्यातून शिवसेना तावून सलाखून बाहेर पडलेली आहे. शिवसेनेने महाराष्ट्र प्रकाशमान केला आहे. अशा प्रकाराने शिवसैनिकांचं मनोधैर्य खच्ची होईल असं त्यांना वाटत असेल तर ते भ्रमात आहेत. यातून शिवसेना अधिक उसळून बाहेर पडेल आणि काम करेल, असा इशाराच त्यांनी दिला.

मॉलमधून मद्यविक्री करण्याचं धोरण राज्य सरकार आणत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. मॉलमधून वाईन विकण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली होती. तो निर्णय द्राक्ष उत्पादक आणि शेतकऱ्यांच्या हिताचा होता. तेव्हा सरकार मद्य धोरणाला पाठिंबा देत असल्याचा आरोप करण्यात आला.

आज तेच धोरण सरकार आणत आहे. नाईट लाईफला विरोध करणारे आशिष शेलार आज कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला. भाजपच्या आमदारांनी आपली स्वत:ची वक्तव्ये काढून पाहावीत. हे दुतोंडी साप आहेत. दोन्ही बाजूने वळवळत आहेत. वळवळू द्या, अशी टीकाही त्यांनी केली.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...