AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! मोदी सरकार सहा महिन्यात गाशा गुंडाळणार? बड्या नेत्याचं भाकीत

संजय राऊत यांचा मोठा दावा: मोदी सरकार पुढील सहा महिन्यांत पायउतार होईल. त्यांनी अटक आणि गुन्हे दाखल करण्याच्या धमक्यांना भीक न घालता, हुकूमशाहीविरोधात लढण्याचा निर्धार व्यक्त केला. राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील 'इंडिया' आघाडीची बैठक दिल्लीत होणार असून, पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.

सर्वात मोठी बातमी ! मोदी सरकार सहा महिन्यात गाशा गुंडाळणार? बड्या नेत्याचं भाकीत
narendra modi Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 13, 2026 | 10:32 AM
Share

तुम्हाला आमच्यावर जेवढे गुन्हे दाखल करायचे तेवढे करा. आम्हाला अटक करायची तर अटक करा. आम्ही घाबरत नाही. तुमची आता जाण्याची वेळ आली आहे. पुढच्या सहा महिन्यात मोदी सरकारला गाशा गुंडाळावा लागणार आहे, असा दावाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला आहे.

काल आंदोलन सुरू होतं. यावेळी पोलिसांनी राहुल गांधी यांना आंदोलन करण्यापासून मज्जाव केला. तेव्हा राहुल गांधींनी विचारलं, आम्ही आंदोलन करायला कुठे बसायचं? या देशात आंदोलनावर हुकूमशाहाने बंदी आणली का? हे सांगावं. लोकशाहीत आंदोलनावर अशी बंदी आणता येणार नाही. अशी बंदी झाली तर नरेंद्र मोदींना राजीनामा द्यावा लागेल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

गुन्ह्याची भीती कुणाला दाखवता?

काल पाच आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यावरूनही राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. पाच काय पाच हजार गुन्हे दाखल होऊ द्या. पाच गुन्हे दाखल झाले म्हणून सरकारला कौतुक वाटते का? आमच्या मुंबईतील आंदोलकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे आणि वरूण सरदेसाईंवर गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्ह्याची भिती कुणाला दाखवता? करा गुन्हे दाखल, अटक करा. तुमच्या जाण्याची वेळ आली आहे. आपल्याला पुढच्या सहा महिन्यात दिल्लीतून गाशा गुंडाळावा लागेल, असा दावा राऊत यांनी केला.

संध्याकाळी निर्णय होईल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज इंडिया आघाडीची बैठक बोलावली आहे. त्याची माहितीही राहुल गांधी यांनी दिली. आज 4 वाजता राहुल गांधींनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना चहापाणासाठी बोलावलं आहे. कालचं आंदोलन यशस्वी झालं. त्यामुळे ही बैठक होत आहे. या बैठकीत पुढील आंदोलनावर चर्चा होईल आणि पुढची दिशा ठरवली जाईल. संध्याकाळी पुढची दिशा ठरेल, अशी माहिती त्यांनी दिली.

सुनावणी लवकर संपो

शिवसेना पक्ष आणि चिन्हावर आज सुनावणी होत आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सुनावणी लवकरात लवकर संपो. हा देशाच्या लोकशाहीला उर्जितावस्था लाभणारा निर्णय येवो, असं ते म्हणाले.

Follow Us
शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष-चिन्ह प्रकरणात आज महत्त्वाची सुनावणी; सुप्रीम कोर्टात काय घडणार?
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा