Sanjay Raut : केंद्रानं ओमिक्रॉनच्या सूचना दिल्या, विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का?: संजय राऊत

शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश निवडणूक, (UP Election) महाराष्ट्र सरकार, विधिमंडळाचं अधिवेशन, ओमिक्रॉन (Omicron) यावर भाष्य केलं.

Sanjay Raut : केंद्रानं ओमिक्रॉनच्या सूचना दिल्या, विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का?: संजय राऊत
संजय राऊत
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 10:13 AM

नवी दिल्ली: शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश निवडणूक, (UP Election) महाराष्ट्र सरकार, विधिमंडळाचं अधिवेशन, ओमिक्रॉन (Omicron) यावर भाष्य केलं. लखीमपूर खेरी प्रकरणी आम्ही काल मार्च काढला होता. राहुल गांधी यांनी त्यावेळी सांगितलं की काही झालं तरी आम्ही तुरुंगात पाठवल्याशिवाय राहणार नाही. शेतकरी आंदोलनाचा इतिहास पाहता हे अशक्य नाही. राहुल गांधीचा हा आत्मविश्वास पाहता उत्तर प्रदेशात सत्ताबदल होतोय, त्यापाठोपाठ केंद्रातही सत्ता बदल होणार आहे, असं संजय राऊत म्हणाले. उत्तर  प्रदेशात राजकीय परिवर्तन होईल, असं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), देशाचे गृहमंत्री तिथं आठ आठ दिवस मुक्काम टाकून का बसलेले आहेत,असा सवाल संजय राऊत यांनी केला. पश्चिम बंगालमध्येही त्यांनी असाच डेरा टाकला होता. पण त्यांचा पराभव झाला होता, असं संजय राऊत म्हणाले.

पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातून नवी सुरुवात

पश्चिम बंगाल आणि  महाराष्ट्रातून एक नवी सुरुवात झालीय, असंही संजय राऊत म्हणाले. देशातील पाच राज्यातील परिवर्तनाची दिशा काय आहे हे तुम्हाला दिसून येईल, असं संजय राऊत म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्याची गरज नाही

तुमच्या सल्ल्याची गरज नाही, तुमच्या सल्ल्यावर राज्य चालत नाही. मुख्यमंत्री सक्षम आहेत, उपमुख्यमंत्री सक्षम आहेत. संपूर्ण मंत्रिमंडळ व्यवस्थितपणे काम करतंय हे चंद्रकांत पाटलांना माहिती आहे. विरोधी पक्षाचं काम करा,  असं संजय राऊत म्हणाले.

आम्ही काही गोष्टी केंद्राकडून शिकलो

विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा नियम बदलल्यावरुन टीका होत असेल तर आम्ही तो धडा केंद्र सरकारकडून घेतला आहे. मोदी सरकारच्या पावलावर आम्ही काही गोष्टींसाठी पाऊल टाकत आहोत.

विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का?

केंद्र सरकारनं ओमिक्रॉनसंदर्भात सूचना दिल्या आहेत. केंद्रांच्या सूचनाप्रमाणं अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात आला आहे. विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना त्रास 2024 पर्यंत

भाजपच्या कार्यालयातून ईडीची सूत्र हालत असतील तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्रास होणार हे गृहीत धरलं आहे. जया बच्चन यांची सूनबाई आणि लेकासंदर्भात वाचलं आहे. जे सरकारला प्रश्न विचारतील त्यांना त्रास दिला जाईल हे 2024 पर्यंत सुरु राहील. मात्र,  2024 पासून उलटी गंगा वाहयला सुरुवात होईल, असं संजय राऊत म्हणाले.

इतर बातम्या:

Maharashtra Assembly Winter Session 2021 Live : विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी महाविकासआघाडीची बैठक, मुख्यमंत्री व्हिसीद्वारे सहभागी होणार

Maharashtra MLS Winter Session : विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजप विविध मुद्यांवरुन ठाकरे सरकारला घेरणार? विधानसभा अध्यक्षपदाची संधी कुणाला?

Sanjay Raut said BJP will lost UP Election and Lok Sabha Election 2024 said why Narendra Modi and Amit Shah going to UP

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.