Pitbull attack: पिटबुलचा दुसरा हल्ला, लहान मुलाचा खाल्ला कान, कुत्र्याला गल्लीत फिरवत होता मालक, अचानक केला हल्ला

13 वर्षांचा गुरप्रीत त्याच्या वडिलांसोबत शेतावरुन घरी परतत होता. त्याचवेळी गावातील एक व्यक्ती आपल्या पिटबुल कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडली होती. गुरप्रीतला पाहताच पिटबुलने भुंकणे सुरु केले. इतकेच नाही तर मालकाच्या हातातील पट्टा सोडवून घेत त्याने गुरप्रीतवर हल्ला केला.

Pitbull attack: पिटबुलचा दुसरा हल्ला, लहान मुलाचा खाल्ला कान, कुत्र्याला गल्लीत फिरवत होता मालक, अचानक केला हल्ला
पिटबुलचा दुसरा हल्ला Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 3:56 PM

गुरदासपूर – पिटबुल (Pitbull) घरात असलेल्या एका वृद्ध महिलेचे लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाल्याचे लखनौतील प्रकरण ताजे असतानाच आता पिटबुलच्या हल्ल्याचा (Attack)दुसरा एक प्रकार समोर आला आहे. आपल्या वडिलांसोबत जात असलेल्या एका 13 वर्षांच्या मुलावर पिटबुलनिे हल्ला केल्याच घटना घडली आहे. पंजाबच्या (Punjab)गुरदासपूरमध्ये हा प्रकार घडलाय. वडिलांनी हिंमत करुन या कुत्र्याचा मुकाबला केला आणि मुलाला पिटबुलच्या तावडीतून वाचवले. या हल्ल्यात 13 वर्षांच्या मुलाच्या कानाचा चावा पिटबुलने घेतला, आणि त्या मुलाच्या चेहऱ्यावर त्याने पंज्याने वार केले. या मुलाला त्यानंतर बटालाच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गुरप्रीत असे यामुलाचे नाव असून, त्याच्या कानाचा मोठा भाग कुत्र्याच्या चाव्याने कापला गेलेला आहे.

मुलाला पाहून भुंकला मग चावण्यासाठी धावला

पिटबुल कुत्रे हे धोकादायक मानले जातात. इतकं असूनही लोकं त्यांना पाळण्याचा मोह दूर करु शकत नाहीत. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा बटालाजवळच्या कोटली गावात पिटबुल डॉगने हल्ला केल्याची घटना घडली आहे. 13 वर्षांचा गुरप्रीत त्याच्या वडिलांसोबत शेतावरुन घरी परतत होता. त्याचवेळी गावातील एक व्यक्ती आपल्या पिटबुल कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडली होती. गुरप्रीतला पाहताच पिटबुलने भुंकणे सुरु केले. इतकेच नाही तर मालकाच्या हातातील पट्टा सोडवून घेत त्याने गुरप्रीतवर हल्ला केला.

वडिलांच्या समयसूचकतेने वाचले प्राण

गुरप्रीतवर झालेल्या हल्ल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी त्याचे वडील धावले. त्यांनी पिटबुलचे तोंडच पकडून ठेवले. त्यानंतर या कुत्र्याशी संघर्ष करत त्यांनी आपल्या मुलाची सोडवणूक केली. तोपर्यंत पिटबुल गुरप्रीतच्या कानाला चावला होता. गुरप्रीतच्या आजीने सांगितले की, त्यांचा नातू त्याच्या वडिलांसोबत शेतात गेला होता. तिथे खराब झालेली स्कूर नीट करुन ते दोघेही घरी परतत होते. त्याचवेळी रस्त्यात पिटबुलने त्यांच्यावर हल्ला केला.

हे सुद्धा वाचा

मुलाची प्रकृती स्थिर

या मुलाला जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे गुरप्रीतवर इलाज करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, त्याच्या शरिरावर अनेक ठिकाणी कुत्र्याच्या पंजामुळे ओरखडे उमटले आहेत. कामाचा मोठा भाग कुत्र्याच्या चाव्यामुळे पला गेलेला आहे. त्याच्या गालावरही जखम झाली आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

लखनौत वृद्ध महिलेचा झाला होता मृत्यू

लखनौत एका जिम ट्रेनरच्या घरी असलेल्या पिटबुलने घरात कुणीही नसताना घरातील वृद्ध महिलेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात या महिलेच्या शरिराचे लचके त्याने तोडले. वेळेत उपचार न मिळाल्याने आणि मोठा रक्तस्राव झाल्याने तिचा मृत्यू झाला. जिम ट्रेनरची ही महिला आई होती. मात्र तरीही पिटबुल हा धोकादायक नसल्याचे या मालकाचे म्हणणे आहे.

Non Stop LIVE Update
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.