काश्मिरात 12 तासांत दुसरा दहशतवादी हल्ला, दहशतवाद्यांनी बडगाममध्ये दोन प्रवाशांना मारल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, सकाळी बँक मॅनेजरची केली हत्या

बडगाम जिल्ह्यातील मगरेपोरा येथे दोन प्रवासी मजुरांवर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकाच्या खांद्यात तर दुसऱ्याच्या हातावर गोळी लागली होती. त्यानंतर तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे उपाचारादरम्यान खुशदील यांनी प्राण सोडले. तर पंजाबच्या गुरुदासपूरचे रहिवासी असलेल्या गोरिया यांच्यावर उपचार सुरु आहेत.

काश्मिरात 12 तासांत दुसरा दहशतवादी हल्ला, दहशतवाद्यांनी बडगाममध्ये दोन प्रवाशांना मारल्या गोळ्या, एकाचा मृत्यू, सकाळी बँक मॅनेजरची केली हत्या
Kashmir new attackImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Jun 02, 2022 | 10:57 PM

श्रीनगर – काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगच्या (target killing) थांबायचे नाव घेत नाहीयेत. गुरुवारी सकाळी राजस्थानच्या एका बँक मॅनेजरची हत्या (Bank manager)करण्यात आली. त्यानंतर रात्री बडगाम जिल्ह्यात दोन गैरकाश्मिरी नागरिकांनाही ( two passengers shot dead)दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. यात बिहारमध्ये राहणाऱ्या दिलखुश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पंजाबचे रहिवासी असलेल्या गोरिया यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येते आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बडगाम जिल्ह्यातील मगरेपोरा येथे दोन प्रवासी मजुरांवर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात एकाच्या खांद्यात तर दुसऱ्याच्या हातावर गोळी लागली होती. त्यानंतर तातडीने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. जिथे उपाचारादरम्यान खुशदील यांनी प्राण सोडले. तर पंजाबच्या गुरुदासपूरचे रहिवासी असलेल्या गोरिया यांच्यावर उपचार सुरु आहेत.

सकाळी बँकेत घुसून मॅनेजरची केली हत्या

गुरुवारी सकाळी दहशतवाद्यांनी राजस्थानातील रहिवासी असलेल्या बँक मॅनेजरची कुलगामच्याबँकेत घुसून हत्या केली होती. ३ दिवसांपूर्वी कुलगाममध्येच एका शिक्षकाची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. परिसरातील ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मोहनपोरा शाखेतील विजय कुमार यांना दहशतवाद्यांनी गोळी मारली. अत्यंत गंभीर स्थितीत त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तिथे त्यांचा मृत्यू झाला. आता दहशतवाद्यांच्या तपासासाठी सर्च ऑपरेशन राबवण्यात येते आहे.

गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली बैठक

काश्मिरात सुरु असलेल्या टार्गेट किलंग प्रकरणांनंतर आणि काश्मिरी पंडितांनी खोऱ्यातून निघून जाण्याच्या दिलेल्या इशाऱ्यानंतर दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि रॉ प्रमुख यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. उद्या शुक्रवारी ही बैठक होईल. यात डोवाल यांच्यासह जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा, पीएमओचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह, काश्मीरचे पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ सुरक्षा अधिकारी उपस्थित राहतील.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.