मुंबई : भारतीय रेल्वे (Indian Railways) सतत तंत्रज्ञान विकसित करत असते. आजचा दिवस रेल्वेसाठी अत्यंत खास आणि ऐतिहासिक आहे. आज दोन रेल्वे गाड्यांची फुल स्पीडमध्ये टक्कर (Collision) होणार आहे. विशेष म्हणजे यादरम्यान एका ट्रेनमध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) स्वतः तर दुसऱ्या ट्रेनमध्ये रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष उपस्थित असणार आहेत. रेल्वे आज स्वदेशी ट्रेन टक्कर संरक्षण तंत्रज्ञान ‘कवच’ ची चाचणी घेणार आहे. ही चाचणी सिकंदराबाद (Secunderabad) येथे होणार आहे. यामध्ये दोन गाड्या विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांकडे येतील.