AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेस विरोध करणाऱ्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे बदलले सूर

ram mandir pran pratishtha | मोदी यांनी कलम 370 रद्द केले. तेव्हा मी त्याचे स्वागत केले होते. सामान नागरी कायद्याचे आम्ही समर्थन नाही करत का? श्रीराम जन्मभूमीचा निर्णय आल्यानंतर सरकारने ज्या प्रकार परिस्थिती हाताळली आम्ही त्याचे कौतूक केले नव्हते का? असे सांगत शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी मोदी यांचे कौतूक केले.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेस विरोध करणाऱ्या शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचे बदलले सूर
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jan 22, 2024 | 11:52 AM
Share

अयोध्या, दि.22 जानेवारी 2024 | राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासंदर्भात ज्योतिष पीठ के शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी प्रश्न उपस्थित केले होते. शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला विरोध केला होता. मंदिर अपूर्ण असताना प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असल्याचे म्हटले होते. ना काशीमधील आचार्य आणि ज्‍योतिषाचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी उत्तर दिले आहे. देशातील प्रमुख मंदिरांचे काम अपूर्ण असताना काम झाल्याचे दाखले उदाहरणांसह दिले. यासंदर्भात शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांना पत्रही लिहिले होते. आता शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांचे सूर बदलले आहे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे.

आता काय म्हणाले शंकराचार्य अविमुक्तेश्वर

शंकराचार्य अविमुक्तेश्वर यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतूक केले आहे. त्यांनी म्हटले की, मला मोदी विरोधी दाखवण्याचा प्रयत्न माध्यमांकडून केला जात आहे. मी अनेकवेळा सरकारचे कौतूक केले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर हिंदूच्या स्वाभिमान जागृत झाला आहे. नरेंद्र मोदी यांचा सारखा हिंदूंचे समर्थन करणारा पंतप्रधान अजूनपर्यंत झाला नाही.

हिंदू म्हणून मी कसा विरोधी

अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी एएनआशी बोलताना सांगितले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान हिंदूंचा स्वाभिमान जागा झाला आहे. मी यापूर्वी अनेक वेळा सांगितले आहे की मी मोदीविरोधी नाही. मी नेहमी त्यांचे कौतूक केले आहे. कारण हिंदूंची बाजू इतक्या ठामपणे मांडणारा अजून एकही पंतप्रधान झाला नाही. मी इतर कोणावर टीका करत नाही. पण मोदींची विशेषता मान्य करावी लागणार आहे. हिंदू भावनांचे त्यांनी समर्थक केले आहे. एक हिंदू म्हणून मी कसा विरोधी असू शकतो.

मोदी यांनी कलम 370 रद्द केले. तेव्हा मी त्याचे स्वागत केले होते. सामान नागरी कायद्याचे आम्ही समर्थन नाही करत का? श्रीराम जन्मभूमीचा निर्णय आल्यानंतर सरकारने ज्या प्रकार परिस्थिती हाताळली आम्ही त्याचे कौतूक केले नव्हते का? जेव्हा, जेव्हा हिंदू भावांना बळ मिळतो, तेव्हा आम्हाला आनंद होतो, असे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले.

हे ही वाचा

प्राणप्रतिष्ठेसंदर्भात वाद निर्माण करणाऱ्या शंकराचार्यांना गणेश्वर शास्त्री द्रविड यांनी दिले सडेतोड उत्तर

Follow Us
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...