रामदास आठवले यांची जादुची छडी, महाराष्ट्रात जमलं नाही ते तिकडे कसं कमवलं?

राजकीय गणित जुळवण्यात आठवले माहिर आहेत., म्हणूनच जी कामगिरी ते आजवर महाराष्ट्रात करु शकले नाहीत. ते त्यांनी नागालँडमध्ये करुन दाखवलं.

रामदास आठवले यांची जादुची छडी, महाराष्ट्रात जमलं नाही ते तिकडे कसं कमवलं?
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 12:10 AM

मुंबई | केंद्रीय मंत्री आणि रिपाई आठवले गटाते प्रमुख रामदास आठवले यांना जे अद्याप महाराष्ट्रात जमलं नाही, ते त्यांनी नागालँडमध्ये करुन दाखवलं. भाजप आणि स्थानिक पक्षांशी युती न करता नागालँडमध्ये आठवलेंचे २ आमदार जिंकले आणि त्याच विधानसभेत राष्ट्रवादी प्रमुख विरोधी पक्षही बनला. हे सारं नेमकं घडलं कसं सविस्तर जाणून घेऊयात

मै बजा दुंगा पाकिस्तान का बँड., इसिलिये आया हु मैं नागालँड. आठवलेंचं हे वाक्य नागालँड निवडणुकीत चर्चेत होतं. इकडे महाराष्ट्रात कसबा-चिंचवडच्या दोन जागांसाठी मविआ आणि भाजपला घाम फुटला. पण तिकडे आठवलेंनी कुणाला हवाही न लागू देता नागालँडमध्ये दोन आमदार निवडून आणले.

नागालँडच्या 60 जागापैकी NDPP नं 24 जागा जिंकल्या. भाजपला 12 जागांवर यश आलं.  भाजपचा मित्रपक्ष असलेला NPF नं 2 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीनं 7 आणि आठवलेंच्या रिपाइनं 2 आमदार निवडून आणले.

नागालँडमधले आठवलेंचे दोन आमदार भाजपला पाठिंबा देणार आहेत. तर नागालँडमध्ये प्रमुख विरोधीपक्ष राष्ट्रवादी असेल. विशेष म्हणजे काँग्रेसनं इथं 24 जागा लढवल्या त्यापैकी एकही जागा जिंकली नाही. आठवलेंच्या रिपाइंनं 8 पैकी 2 जागा जिंकल्या आणि राष्ट्रवादीनं उभ्या केलेल्या 12 पैकी 7 जण निवडून आले.

माहितीनुसार आठवलेंचा रिपाइंनं अनेक वर्षांपासून नागालँड भागात काम सुरु केलं होतं. भाजपसोबत युतीत लढण्याची त्यांची इच्छा होती.  मात्र नागालँडमद्ये भाजपचा आधीपासून मित्रपक्ष असल्यामुळे भाजपनं युतीस नकार दिला. त्यामुळे आठवलेंनी 8 जागांवर स्वतंत्र उमेदवार दिले. प्रचारात भाजप सरकारचं कौतुक करत जिथं रिपाइंचे उमेदवार नाहीत. तिथं आठवलेंनी भाजपला पाठिंबा दिला.

राजकीय गणित जुळवण्यात आठवले माहिर आहेत., म्हणूनच जी कामगिरी ते आजवर महाराष्ट्रात करु शकले नाहीत. ते त्यांनी नागालँडमध्ये करुन दाखवलं. दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी नागालँडमधला प्रमुख विरोधीपक्ष बनलाय.

जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. तेव्हा त्यांच्यासोबत बिहारचे तारिक अन्वर आणि मेघालयचे पी.ए.संगमाही राष्ट्रवादीत आले. त्यामुळे मेघालय, मणिपूर आणि नागालँडमध्येही याआधीपासून राष्ट्रवादीचं संघटन राहिलंय. नंतर बाहेर पडून पी.ए.संगमांनी स्वतंत्र पक्ष काढला. ज्याची सूत्रं सध्या संगमांच्या मुलाकडे आहेत. पण तरीही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे ७ उमेदवार निवडून आणले.

स्थापनेपासून आजवर राष्ट्रवादीचे कधीच दोन आकडी खासदार जिंकलेले नाहीत., तरीही राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादीला मान्यता आहे. भारतात सध्या भाजप, काँग्रेस, बसपा, आम आदमी पार्टी, राष्ट्रवादी, भाकप आणि माकप असे ७ राष्ट्रीय पक्ष आहेत.

राष्ट्रीय मान्यतेसाठी पक्षाला लोकसभेत ३ राज्यात २ टक्के जागा, किंवा ४ राज्यात लोकसभा-विधानसभेत ६ टक्के मतं आणि ४ खासदारांची गरज लागते. राष्ट्रवादीनं आजपर्यंत महाराष्ट्राबाहेर बिहार, केरळ, गुजरात, मणिपूर, नागालँड, लक्षद्विप इथं लोकप्रतिनिधी निवडून आणले आहेत. महाराष्ट्राबाहेर सर्वात चांगली कामगिरी राष्ट्रवादीनं 2012 च्या गुजरात निवडणुकीवेळी केली होती., तेव्हा राष्ट्रवादीचे गुजरातमध्ये ९ आमदार जिंकले होते.

पण याच गणितामुळे राष्ट्रवादी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे. गुजरात निवडणुकीनंतर आम आदमी पार्टीही आता राष्ट्रीय पक्षांच्या यादीत येऊन बसलीय.

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.