Shashi Tharoor: लोकसभेत 815 जागा झाल्या तर काही खासदार केवळ टाळ्या वाजण्यासाठीच… शशी थरूर यांना कोणती भीती? राजकीय पक्षांना मोठा इशारा

Shashi Tharoor on Delimitation Bill: काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात मोठा गंभीर इशारा दिला आहे. खासदार वाढीचे गाजर किती महागात पडू शकते याविषयीची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. राजकीय पक्षांना त्यांनी मोठा इशारा दिला आहे.

Shashi Tharoor: लोकसभेत 815 जागा झाल्या तर काही खासदार केवळ टाळ्या वाजण्यासाठीच... शशी थरूर यांना कोणती भीती? राजकीय पक्षांना मोठा इशारा
लोकसभेत 815 जागा झाल्या तर काही खासदार केवळ टाळ्या वाजण्यासाठीच... शशी थरूर यांना कोणती भीती? राजकीय पक्षांना मोठा इशारा
| Updated on: Nov 29, 2026 | 8:35 AM

Shashi Tharoor on Delimitation Bill: उद्या, 30 नोव्हेंबर 2026 रोजीपासून संसदेचे चार दिवसीय विशेष अधिवेशन होत आहे. त्याचवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ खासदार शशी थरूर यांनी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाविरोधात मोठा गंभीर इशारा दिला आहे. खासदार वाढीचे गाजर किती महागात पडू शकते याविषयीची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. जमशेदपूर येथे एक्सएलआरआयमध्ये (XLRI) आयोजित 34 व्या जेआरडी टाटा ओरेश कार्यक्रमात ते सहभागी झाले होते. त्यावेळी थरूर यांनी राजकीय पक्षांना त्यांनी मोठा इशारा दिला आहे.

संख्या वाढेल, पण खासदाराचे मूल्य वाढणार?

Loading...

जमशेदपूर येथील कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. लोकसभेत प्रत्येक राज्याचे प्रतिनिधित्व वाढेल. ही संख्या 815 इतकी होईल. पण सभागृहात हे खासदार केवळ टाळ्या पिटण्यापुरतेच मर्यादित राहतील, असा मोठा इशारा काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी दिला. त्यांनी सध्याच्या परिस्थितीकडे बोट दाखवले. लोकसभेत खासदारांना त्यांच्या भागातील अडचणी, समस्या मांडण्यासाठी प्रश्न विचारण्यासाठी आणि शून्यप्रहारात बोलण्यासाठी आताच पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे संसदेत सदस्य संख्या वाढवली तरी संसदेचे कामकाज चालवण्याचे मोठे आव्हान सर्वांसमोर असेल. संसदेचा मुळ उद्देश सरकारला उत्तरदायी, सरकारला जबाबदार धरणे हे असते, केवळ सदस्य संख्या वाढवणे नसते, असा टोलाही शशी थरूर यांनी हाणला. हे पाऊल राष्ट्रीय हितासाठी उचलले आहे की सत्ताधारी पक्षाच्या निवडणूक फायद्यासाठी हे केंद्र सरकारने देशाला स्पष्ट करावे, असेही थरूर म्हणाले.

25 वर्षांपर्यंत नाही बदल

शुक्रवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मतदारसंघ पुनर्रचना आणि महिला आरक्षण विधेयकाला मंजूरी दिली होती. संविधानातील 132व्या सुधारणा आणि डिलिमिटेशन विधेयक 30 नोव्हेंबर रोजीपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात सादर करण्यात येणार आहे. या प्रस्तावित मुसद्यानुसार, राज्यात 815 आणि केंद्र शासित प्रदेशात 35 सह लोकसभेच्या कमाल जागांची मर्यादा 850 करणे आणि वर्ष 2051 पर्यंत राज्यांची सध्याचे गुणोत्तर प्रमाण कायम ठेवण्याची तरतूद आहे.

यापूर्वी याच वर्षी एप्रिल 2026 मध्ये हे दोन्ही विधेयक केंद्र सरकारने सादर केली होती. पण विरोधकांच्या एकजुटीमुळे हे विधेयक बारगळली होती. थरूर यांनी मतदार संघाच्या सीमा बदलून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न होऊ शकतो, याकडे लक्ष वेधले. तर 25 वर्षांनी जेव्हा लोकसंख्येच्या आधारावर डिलिमिटेशन होईल. तेव्हा प्रतिनिधित्व आणि महसूल वाटपावर मोठा परिणाम होईल, असा इशाराही थरूर यांनी दिला आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us