AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप प्रवक्त्यांना पगार मिळतो का? आधी राजीनामा दिला, आता नेत्याने सिक्रेट सांगितलं

भाजप पक्ष सोडल्यानंतर शहजाद पुनावाला यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनी आता नोकरी करणार असल्याचे सांगितले.

भाजप प्रवक्त्यांना पगार मिळतो का? आधी राजीनामा दिला, आता नेत्याने सिक्रेट सांगितलं
BJPImage Credit source: tv9
| Updated on: Aug 18, 2026 | 12:56 PM
Share

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यावरून शहजाद पुनावाला यांनी पक्षाचा राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. भाजपचा राजीनामा देऊन शहजाद यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच भाजप प्रवक्त्याला कोणताही पगार मिळत नसतो. व्यक्ती स्वेच्छेने पद सांभळत असतो. मी राजीनाम्यावर ठाम असून आता कोणताही निर्णय बदलणार नाही, असेही शहजाद यांनी स्पष्ट केले. शहजाद पुनावाला यांनी 30 जुलै रोजी राजीनामा भाजप पक्षाचे अध्यक्ष नितीन नवीन यांच्याकडे सोपवला होता.

आता राजकारणाऐवजी नोकरी करणार – पुनावाला 

मीडिया रिपोर्टनुसार, शहजाद पुनावाला यांनी सांगितलं की, मी 2024 साली पक्ष सोडण्याची योजना आखली होती. माझं वैयक्तिक काम आणि राजकीय पक्षासाठी काम करताना आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यामळे पुन्हा नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे’. मी 2024 सालापासून राजकारणातून बाहेर पडण्याची योजना आखत आहे. मी आधी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये होतो. या नोकरीतून पगार मिळत होता. परंतु मी नोकरी सोडली. मी राजकारणात वेळ देण्यास सुरुवात केली. परंतु पुन्हा नोकरी करायची आहे. राजकारणाऐवजी आता मी नोकरी करण्याचा पर्याय निवडला आहे, असे त्यांनी सांगितले.

विचारधारेचं कायम समर्थन करणार – शहजाद पुनावाला 

‘मी राजीनामा दिल्यानंतर पक्षाने संपर्क साधला. परंतु पक्षाने निर्णयावर पुन्हा विचार करण्यास सांगितले. परंतु मी पुन्हा राजकारणात जायला तयार नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. पक्षाच्या पगार मिळत नाही. हे पद स्वेच्छेने स्वीकारावे लागते, असेही पुनावाला यांनी सांगितले. शहजाद यांनी पुढे सांगितले की, ‘भाजपने कधीही माझं मत मांडताना रोखलं नाही. भाजपमध्येच मत मांडण्याचे स्वातंत्र्य मिळते. एखादी कोणती गोष्टी असल्यास भाजप (BJP) नेते बोलावून चर्चा करायचे. मी आता थेट भाजपसाठी काम करणार नाही. परंतु पक्षाच्या विचारधारेचं समर्थन कायम करणार आहे. तरुण, मध्यम वर्गीयांना राजकारणात काम करण्यासाठी भाजप चांगला पर्याय आहे, असेही शहजाद पुनावाला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...