AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

56 इंची छातीचे पंतप्रधान असताना लंडनमध्ये हिंदुस्थानचा तिरंगा उतरतोच कसा? सामनातून शिवसेनेचा परखड सवाल

लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयावरील तिरंगा काही खलिस्तानवाद्यांनी उतरवल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्यावरून शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला आहे.

56 इंची छातीचे पंतप्रधान असताना लंडनमध्ये हिंदुस्थानचा तिरंगा उतरतोच कसा? सामनातून शिवसेनेचा परखड सवाल
Image Credit source: social media
| Updated on: Mar 21, 2023 | 9:55 AM
Share

मुंबई : देशभरात हिंदुत्वाच्या (Hindutwa) नावाखाली भाजपकडून (BJP) जिहाद मोर्चे काढले जात आहेत. उद्या इतर धर्मियांनी जिहादी मोर्चा काढले तर भारतात धर्मयुद्ध माजेल, त्यामुळे केंद्र सरकारने वेळीच सावध व्हावे, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. सामना या मुखपत्रातून शिवसेनेने लंडनमधील एका गंभीर घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी भारताच्या उच्चायुक्तालयावर फडकणारा तिरंगा ध्वज खाली उतरवला. कॅनडातही तशीच स्थिती आहे. तर भारतात अशांततेची सुरुवात झाली आहे. लोकशाही, स्वातंत्र्य आणि देश धोक्यात आहे. अंध भक्तांना हे दिसत नाही, असं खोचक वक्तव्य सामनातून करण्यात आलंय.

‘पंजाबात नवे भिंद्रनवाले’

पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीचे अमृतपाल सिंह यांना पंजाबचे नवे भिंद्रनवाले अशा शब्दात शिवसेनेने टीका केली आहे. पंजाबात अमृतपाल सिंह यांच्याविरोधात कारवाई सुरु होताच त्याचे पडसाद लंडनमध्ये उमटले. तेथील भारतीय उच्चायुक्तालयावरील खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. तेथे फडकणारा तिरंगा खाली उतरवला. इतकच नव्हे तर खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला, असा व्हिडिओ व्हायरल होतोय, त्यावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

’56 इंची छातीचे पंतप्रधान..’

भारताला 56 इंची छाती असलेले पंतप्रदान लाभले असताना आपला तिरंगा अशा प्रकारे उतरवण्याची हिंमत अतिरेक्यांची व्हावी, हे धक्कादायक असल्याची टीका सामनातून करण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचं भाष्य केलं. तो देशद्रोह असल्याचा आरोप भाजपवाले करतायत. मग त्याच लंडनमध्ये हिंदुस्थानी उच्चायुक्त कार्यालयात घुसून खलिस्तानवाद्यांनी तिरंगा उतरवला, धुडगूस घातला हा देशाचा अपमान नाही का, असा सवाल सामनातून करण्यात आलाय.

त्यांचा हिंदुस्थान वेगळा…

पंजाबमधील अमृतपाल सिंह याच्या दहशतवादी कारवायांना पाकिस्तानातून मदत मिळत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. पंजाबमध्ये हिंदुस्थान अशांत आणि अस्थिर कऱण्याचे कारस्थान पाकिस्तानने रचले आहे. पण इथे नरेंद्र मोदी यांचं सरकार राजकीय विरोधकांच्या मागे हात धुवून लागले आहे. खलिस्तानची भुताटकी डोके वर काढत आहे. तिरंग्यास हात घालेपर्यंत त्यांची धुंदी वाढली आहे. पंजाबमध्ये भाजपचे सरकार नसल्याने केंद्र सरकार तिकडे दुर्लक्ष करते आहे. एका भिंद्रनवालेमुळे पंजाबसह देशात रक्ताच्या नद्या वाहिल्या. इंदिरा गांधींचे बलिदान त्या हिंसेत झाले. आज तिथे नवा भिंद्रनवाले निर्माण होऊ पाहतोय, पण अंध भक्तांना ते दिसत नाही, त्यांचा हिंदुस्थान वेगळा असावा, अशी खोचक टीका सामनातून करण्यात आली आहे.

मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.