धक्कादायक, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदाला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम करतोय थेट फंडिंग, सगळा पैसा जातोय मुंबईतून

हे कोट्यवधी रुपये थेट लष्कर, जैश आणि अल कायदाला पाठवले जात होते. याव्यतिरिक्त नशेचा व्यवसाय, सोना तस्करी आणि इतर माध्यमांतून कमवण्यात आलेला पैसाही दाऊदच्या इशाऱ्यावरुन दहशतवादी संघटनांना पाठवण्यात येत होता, अशीही माहिती सलीमच्या चौकशीत समोर आली आहे.

धक्कादायक, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल कायदाला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम करतोय थेट फंडिंग, सगळा पैसा जातोय मुंबईतून
दाऊदचे दहशतवाद्यांना फंडिंगImage Credit source: social media
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 2:32 PM

नवी दिल्ली- देशभरात दहशवादी कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटना (Terrorist organizations)लष्कर-ए-तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अलकायदा यांना डी कंपनी (D company)मोठ्या प्रमाणावर निधी देत असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे हे पैसे मुंबईतून कमवण्यात येत आहेत. मुंबईतील मालमत्तांचे व्यवहार, मालमत्तांचे वाद सोडवण्याचे काम दाऊद इब्राहिमचे हस्तक करीत आहेत. यातून पाकिस्तानात लपून बसलेला दाऊद (Underworld Don Dawood)  मोठा निधी जमा करीत असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणांनी नुकतेच दाऊदच्या एका हस्तकाला अटक केले, त्याच्या चौकशीत ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. दहशतवाद्यांना हो असलेल्या फंडिंगच्या प्रकरणात एनआयए सध्या तपास करीत आहेत. या सगळ्या तपासात दाऊद इब्राहिम दहशतवादी संघटनांना मोठे फंडिंग करीत असल्याची माहिती समोर आली आहे.

अशी आहे मोडस ऑपरेंडी

पाकिस्तानात लपून राहत असलेला अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम कासकर, डी कंपनीच्या माध्यमातून देशातून कोट्यवधी रुपये एकत्र करुन, हवाला आणि डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने हे पैसे थेट लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अलकायदाला पाठवीत आहे. या सगळ्यासाठी मुंबईत सलीम फ्रूट हा डी कंपनीला मदत करीत होता.

सलीम फ्रूटच चालवत होता डी कंपनी

मोहम्मद सलीम मोहम्मद इक्बाल कुरेशी उर्ऱ सलीम फ्रूट याला एनआयएने 4ऑगस्ट रोजी मुंबई सेंट्रलच्या मीर अपराट्मेंटमधून अटक केली होती. सलीम याच्याकडून काही महत्त्वाची कागदपत्रेही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. सलीम फ्रूट हाच मुंबईत छोटा शकीलच्या नावाने डी कंपनेचे बेकायदेशीर व्यवहार सांभाळत होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत मालमत्तांचे व्यवहार आणि मोठ्या-मोठ्या उद्योगपतींमधील वाद सोडवण्यासाठी डी कंपनी कोट्यवधी रुपयांची आकारणी करते. हे कोट्यवधी रुपये थेट लष्कर, जैश आणि अल कायदाला पाठवले जात होते. याव्यतिरिक्त नशेचा व्यवसाय, सोना तस्करी आणि इतर माध्यमांतून कमवण्यात आलेला पैसाही दाऊदच्या इशाऱ्यावरुन दहशतवादी संघटनांना पाठवण्यात येत होता, अशीही माहिती सलीमच्या चौकशीत समोर आली आहे.

हे सुद्धा वाचा

मसूद अजहरच्या भावाला जागतिक दहशतवादी जाहीर करण्यात चीनची आडकाठी

जैश ए मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा भाऊ अब्दुल रऊफ अजहर याचा समावेश ब्लॅक लिस्टमध्ये करण्याचा प्रस्ताव भारत आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात दिला होता. यात चीनने आडकाठी केली आहे. योग्य माहितीविना आणि योग्य कारणाशिवाय ब्लॅक लिस्टमध्ये दहशतवाद्यांचा समावेश करण्यास रोखणे, हे थांबण्याची गरज असल्याचे मत संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंभोज यांनी व्यक्त केले आहे. १९९९ साली भारतीय विमानाच्या अपहरण प्रकरणाच्या कटात रऊफ याचा सहभाग होता.

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.