AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना खासदाराचा मृत्यू, खळबळ उडवणारी घटना, देशात..

नुकताच एक धक्कादायक अशी घटना पुढे येताना दिसत आहे. चक्क एका खासदाराचा फुटबॉल खेळताना मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली. खासदार आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे.

मित्रांसोबत फुटबॉल खेळत असताना खासदाराचा मृत्यू, खळबळ उडवणारी घटना, देशात..
MP Ricky AJ Syngkon
| Updated on: Feb 20, 2026 | 10:31 AM
Share

एक धक्कादायक अशी घटना पुढे येताना दिसत आहे. या घटनेने देशभरात मोठी खळबळ उडाली. चक्क खासदार फुटबॉल खेळत होते. यावेळी कोणीही विचार करणार नाही, अशी घटना घडली. चक्क फुटबॉल खेळत असताना खासदाराचा मृत्यू झाला. फुटबॉल खेळत असताना कोसळल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर मृत्यू घोषित करण्यात आले. या घटनेने खळबळ उडाली. शिलाँगचे खासदार रिकी एजे सिंगकॉन हे आपल्या मित्रांसोबत फुटबॉल खेळत होते. मावलाई माविओंग क्रीडांगणावर त्यांचा फुटबॉल सामना चांगलाच रंगला होता. फुलबॉल सामना रंगात असताना खासदार अचानक मैदानात कोसळले. त्यानंतर उपस्थित लोकांनी त्यांना लगेचच रूग्णालयात दाखल केले. माविओंग कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे त्यांना नेण्यात आले.

पण कम्युनिटी हेल्थ सेंटर येथे लगेचच डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्यांना वैद्यकीय केंद्रात पाठवण्यात आले. त्यांना डॉ. एच. गॉर्डन रॉबर्ट्स रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. खासदार रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. उपमुख्यमंत्री प्रेस्टोन टायनसॉन्ग, व्हीपीपी अध्यक्ष आर्डेंट मिलर बसियावमोइट, अनेक खासदार, आमदार रूग्णालयात पोहोचले.

खासदार रिकी एजे सिंगकॉन यांनी तीन वेळा राहिलेले काँग्रेसचे खासदार विन्सेंट एच. पाला यांचा तब्बल 3 लाखाहूनही अधिक मतांनी पराभव केला. हा त्यांचा विजय मेघालयाच्या राजकीय परिदृश्यात मोठा बदल घडवून आणणारा होता. रिकी एजे सिंगकॉन यांच्या जाण्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. कोणालाही विश्वास बसत नाहीये की, ते आज आपल्यात नाहीत.

रिकी एजे सिंगकॉन यांच्या जाण्याने मेघालयाच्या राजकारणात एक मोठी पोकळी नक्कीच निर्माण झाली. या प्रकरणात अधिकचा तपास केला जात असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यांच्या कुटुंबावर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रिकी एजे सिंगकॉन यांच्या निधनाबद्दल कळताच कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने त्यांच्या घरी धाव घेतली. आज आपला नेता आपल्यात नाही, यावर कोणालाही विश्वास बसत नाही. मेघालयच्या राजकारणातील अत्यंत मोठे नाव रिकी एजे सिंगकॉन राहिले आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...