मृत्यू फक्त एका सेकंदावर… नवरदेव कारमधून उतरून घोडागाडीत बसणार तोच… जे समोरच पाहिलं त्यामुळे नवरी बेशुद्ध
Shocking News: बागपतमधील एका लग्नाची तयारी सुरु असताना असं काही घडलं की सागळीकडे दुखा:चे वातावरण पसरले. वराचा लग्नादिवशीच अपघाती मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

लग्नसोहळा हा प्रत्येक कुटुंबासाठी खूप खास असतो. सगळीकडे आनंदाचे वातावरण असते, ढोल ताशे वाजत असतात. अशातच आता उत्तर प्रदेशातून धक्कादायक घटना समोर आली आहे. बागपतमधील एका लग्नाची तयारी सुरु असताना असं काही घडलं की सागळीकडे दुखा:चे वातावरण पसरले. सरूरपूर गावात जिथे लग्नाचा उत्साह पहायला मिळत होता, फुलांनी सजवलेली गाडी दाराशी उभी होती. वऱ्हाडी ढोलताशांच्या तालावर नाचत होते, मात्र कारमधून उतरून घोडा गाडीत बसणार तोच नवरदेवाला ट्रकने उडवले आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे ढोलताशांचा आवाज थांबला आणि सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला.
लग्न आणि मृत्यूचा प्रवास काही सेकंदाचा
समोर आलेल्या माहितीनुसार पिचोकारा गावातील रहिवासी सुबोधचे लग्न सरूरपूर येथे होणार होते.सुबोध नातेवाईकांसह गावात पोहोचला. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण होते. रात्री 9.30 च्या सुमारास वराला एका समारंभासाठी बोलावण्यात आले. तो घोडागाडीतून वधूच्या दाराकडे जाणार होता. नातेवाईक हे वराचा सजवण्यात व्यस्त होते. महिला गाणी म्हणत होत्या, मात्र कुणालाही कल्पना नव्हती की, काही वेळात वराचा मृत्यू होणार आहे. सुबोध त्याच्या गाडीतून उतरला आणि घोडागाडीकडे जात होता, त्याचवेळी मागून एक वेगवान ट्रक आला आणि त्याने सुबोधला चिरडले. लगच ट्रक चालक फरार झाला.
लगीन घरावर शोककळा पसरली
ट्रकने सुबोधला धडक दिल्याचे पाहून वऱ्हाडी मंडळी त्याच्याकडे धावली. महिलांनी आरडाओरडा सुरू केला, मुले रडायला लागली. लोक म्हणत होते , ‘अरे देवा, तू काय केलेस? लग्न होणार होतं… हे काय झालं? ढोल-ताशांच्या आवाजाचे रुपांतर आक्रोशात झाले. लग्नाच्या विधी थांबल्या, वधूच्या कुटुंबावर शोककळा पसरली. तिला या घटनेची माहिती मिळताच ती बेशुद्ध होऊन कोसळली. लोकांनी सुबोधला तातडीने रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
ट्रक ड्रायव्हरचा शोध सुरू
या अपघातानंतर ट्रक ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेला आहे. या चालकाला पडडण्यासाठी पोलिसांनी जवळचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासायला सुरुवात केली आहे. असा संशय आहे की ट्रक ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत असल्याने हा अपघात झाला. आता चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रायव्हरचा शोध सुरू आहे.
