AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गाडीचा FASTag स्कॅन न झाल्यास काय कराल? ही झेरॉक्स जवळ ठेवा अन् फुकट प्रवास करा

तुमच्या फास्टॅग वॉलेटमध्ये पैसे असतील आणि टोलनाक्यावर हा FASTag स्कॅन झाला नाही तर तुम्हाला टोल भरण्याची गरज नाही. | FASTag

गाडीचा FASTag स्कॅन न झाल्यास काय कराल? ही झेरॉक्स जवळ ठेवा अन् फुकट प्रवास करा
| Updated on: Feb 21, 2021 | 2:22 PM
Share

मुंबई: केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने सर्व गाड्यांना Fastag अनिवार्य केले आहे. त्यामुळे आता देशातील कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करण्यासाठी तुमच्या गाडीवर Fasttag असणे बंधनकारक आहे. 15 फेब्रुवारीपासून या नियमाची अंमलबजावणी झाली होती. मात्र, त्यानंतर काही वाहनचालकांना टोलनाक्यावर FASTag स्कॅन होत नसल्याच्या अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या वाहनचालकांना दुप्पट टोलचा भुर्दंडही सहन करावा लागत आहे. (What to do FASTag not scan at Toll plaza)

मात्र, आता या समस्येवर केंद्र सरकारच्या एका अधिसूचनेमुळे तोडगा निघू शकतो. केंद्र सरकारच्या जीआरनुसार, तुमच्या फास्टॅग वॉलेटमध्ये पैसे असतील आणि टोलनाक्यावर हा FASTag स्कॅन झाला नाही तर तुम्हाला टोल भरण्याची गरज नाही. त्यामुळे या जीआरची झेरॉक्स नेहमी तुमच्या गाडीत ठेवा. जेणेकरुन FASTag स्कॅन होत नसल्यास तुम्हाला हा जीआर दाखवून दुप्पट टोल भरण्यापासून वाचता येईल.

2018 मध्येच निघाला होता आदेश

FASTag संदर्भातील हा जीआर 2018 सालीच निघाला होता. मात्र, तरीही FASTag स्कॅन न झाल्यास टोलनाक्यांवर वाहनचालकांकडून जबरदस्ती पैसे वसूल केले जातात. मात्र, या जीआरची प्रत दाखवून तुम्ही टोलनाक्यावर कायदेशीरपणे सूट मिळवू शकता.

स्थानिक गावकऱ्यांना फास्टॅग लागणार?

महामार्गाच्या परिसरातील स्थानिक गावकऱ्यांनाही फास्टॅग लागणार आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या 20 किलोमीटर परिसरात येणाऱ्या सर्व गावांतील लोकांना 275 रुपयांत महिनाभराचा फास्टॅग दिला जाईल. आपले आधारकार्ड दाखवून गावकरी हा सवलतीच्या दरातील फास्टॅग मिळवू शकतात.

कसा खरेदी कराल फास्ट टॅग?

फास्ट टॅग देशभरातील कोणत्याही टोल बुथवर खरेदी करता येते. फास्ट टॅग खरेदी करण्यासाठी तुमच्या गाडीच्या रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट्ससह आयडीची आवश्यकता आहे. याव्यतिरिक्त स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक बँक, पेटीएम पेमेंट्स बँक आणि आयडीएफसी फर्स्ट आदि बँकांसह 22 बँकांमधून खरेदी करु शकता. याशिवाय पेटीएम, अमेझॉन आणि फ्लिपकार्डसारख्या ई-कॉमर्स प्लेटफॉर्मवरही तुम्ही फास्ट टॅग खरेदी करु शकता. अनेक बँकांनी आपल्या मोबाईल अॅपवर फास्ट टॅग खरेदीवर डिस्काऊंट, एक्सक्लुसिव्ह ऑफर्स आणि कॅशबॅक ऑफर दिले आहे.

किती आहे फास्ट टॅगची किंमत?

फास्ट टॅगची किंमत दोन बाबींवर अवलंबून आहे. तुमच्याकडे वाहन कोणते आहे आणि तुम्ही कुठून फास्ट टॅग खरेदी करता यावर त्याची किंमत अवलंबून आहे. इश्यू फी आणि सिक्युरिटी डिपॉझिटची किंमत प्रत्येक बँकेची वेगळी असू शकते. फास्ट टॅग तुम्ही घरबसल्या खरेदी करु शकता.

संबंधित बातम्या:

टोलनाक्यांवर Fastag बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल, आता तुम्हीच ठरवा काय करायचं…!

(What to do FASTag not scan at Toll plaza)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.