Shraddha Murder Case: आफताबने श्रद्धाला दिले होते सिगरेटचे चटके, तरी श्रद्धाला द्यायची होती आणखी एक संधी, मित्रांकडून खुलासा

आफताबने श्रद्धाला सिगरेटचे चटके दिले होते. या प्रकारासाठी श्रद्धाच्या मित्रांनी आफताबल दमदाटी देखील केल्याचे मित्रांनी सांगितले.

Shraddha Murder Case:  आफताबने श्रद्धाला दिले होते सिगरेटचे चटके, तरी श्रद्धाला द्यायची होती आणखी एक संधी, मित्रांकडून खुलासा
श्रद्धा हत्याकांड Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Nov 24, 2022 | 4:06 PM

नवी दिल्ली,  श्रद्धा हत्याकांड प्रकरण (Shraddha Murder Case) एकापाठोपाठ एक नवीन खुलासे घेऊन समोर येत आहे. आरोपी आफताबची आज  पॉलीग्राफी चाचणी (Polygraph test) होणार होती, परंतु प्रकृती ठीक नसल्याने ती होऊ शकली नाही. दरम्यान, आता श्रद्धाच्या दोन मित्रांनी आफताब आणि मृतक यांच्या नात्याबाबत अनेक मोठे खुलासे (Update) केले आहेत.या सोबतच काही गंभीर दावे देखील केले गेले आहेत ज्यावरून श्रद्धा आफताबला पाठीशी घालत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते.

श्रद्धाच्या एका मित्राने सांगितले की, तो आफताबला कधीच भेटला नव्हता पण 23 नोव्हेंबर 2020 रोजी तो श्रद्धाला दुसऱ्या मित्राच्या माध्यमातून भेटला. त्यादरम्यान श्रद्धाच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि कमरेवर जखमेच्या खुणा होत्या. मित्राने सांगितले की, त्यांनी श्रद्धाला पोलिस स्टेशनला नेले जेथे तिने स्वतः आफताबविरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर श्रद्धाला तिच्या घरी सोडण्यात आले.

तक्रार दाखल करण्यापूर्वी मित्रांनी श्राद्धाला या जखमांबद्दल विचारणा केली. त्यावर श्रद्धाने सांगितले की, त्याने माझ्यावर दोन तीन वेळा हल्ला केला आहे. ती घाबरलेली होती, डिप्रेशनमध्ये असल्याचे जाणवत होते. तिला मोकळेपणाने बोलता देखील येत नव्हते. तिने पोलिसांना लेखी तक्रार दिली होती. ही घटना जेव्हा घडली तेव्हा ती आफ्ताबसोबत लिव्ह इनमध्ये राहत असल्याचे मित्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

श्रद्धाने तक्रार का मागे घेतली?

पोलिसांकडे दिलेली तक्रार श्रद्धाने परस्पर परत घेतली. याबद्दल मित्रांना कुठलीच कल्पना नव्हती. तक्रार मागे घेण्यामागे आफ्ताबचा दबाव होता की आणखी काही याबद्दल स्पस्ट झाले नसले तरी, एका मित्राने दिलेल्या माहितीनुसार श्रद्धाला आफताबला आणखी एक संधी द्यायची  होती.

मित्राने दिलेल्या माहितीनुसार,  2015 ते 2018 या काळात आम्ही एकत्र कॉलेजला जायचो. शेवटची भेट  2019 मध्ये झाली होती. आफताबने श्राद्धाला तिच्या सर्व मित्रांशी बोलण्यास मनाई केली होती. मित्राने दिलेल्या माहितीनुसार मित्र आणि नातेवाईकांपासून कायमच दूर ठेवले होते.

आफताब ने श्रद्धाला दिले होते सिगारेटचे चटके

2021 मध्ये श्रद्धाने तिच्या जिवलग मित्राला सांगितले की आफताबने तिला सिगारेटचे चटके दिले. या घटनेनंतर श्रद्धाच्या काही मित्रांनी आफताबच्या घरी जाऊन त्याला धमकावले आणि पोलिसांत तक्रार करण्याची भाषा केली. मात्र, श्रद्धाने आफताबला पाठीशी घातले आणि त्याला आणखी एक संधी द्यावी, असे सांगितले.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.