Taj Hotel Video : ताज हॉटेलमध्ये मांडी घालून बसणे गुन्हा आहे? मॅनेजर आला अन्… महिलेने शेअर केला धक्कादायक प्रसंगाचा व्हिडीओ
ताज हॉटेल हे भारताली सर्वात प्रतिष्ठित आणि महागडे हॉटेल आहे. पण एका महिलेने या हॉटेलमधील एक अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. मांडी घालून बसण्यावरून त्यांना मॅनेजरने टोकल्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Taj Hotel : मुंबईतील ताज हॉटेल संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. जगभरातील श्रीमंत आणि प्रतिष्ठीत व्यक्ती या हॉटेलमध्ये राहण्यासाठी तसेच जेवणासाठी जातात. सध्या मात्र एक अजब प्रकार समोर आला आहे. येथे एक महिला आपल्या बहिणीसोबत जेवायला गेल्यानंतर तिच्या बसण्याच्या पद्धतीवर आक्षेप व्यक्त करण्यात आला आहे. ही महिला जेवताना खुर्चीवर मांडी घालून बसलेली असताना ताज हॉटेलच्या मॅनेजरने येऊन ही योग्य बसण्याची योग्य पद्धत नसल्याचे सांगितले आहे. याच घटनेवर महिलेने नाराजी व्यक्त केली असून त्या संदर्भातला एक फोटो सोशल मीडियावर अपलोड केला आहे. आता हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असून नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.
नेमकं काय घडलं?
युअर स्टोरीच्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यांनी आपल्या या व्हिडीओत ताज हॉटेलच्या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. श्रद्धा शर्मा ताज हॉटेलमधील हासऊ ऑफ मिंग या विभागात जेवायला गेल्या होत्या. दिवाळीनिमित्त त्यांच्यासोबत त्यांची बहीणही होती. यावेळी जेवणाच्या टेबलवर त्यांना जेवण देण्यात आले होते. श्रद्धा जेवत होत्या. जेवताना त्या खुर्चीवर मांडी घालून बसल्या होत्या. याच बसण्याच्या पद्धतीवर ताज हॉटेलच्या मॅनेजरने आक्षेप नोंदवला. तुमच्या अशा बसण्याच्या पद्धतीवर इतरांनी आक्षेप नोंदवला आहे, असे मॅनेजने श्रद्धा शर्मा यांना सांगितले. मॅनेजरच्या याच आक्षेपावर श्रद्धा शर्मा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कष्टाने पैसे कमवतो आणि…
शर्मा यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ अपलोड केला आहे. ताज हॉटेलमध्येच बसून त्यांनी हा व्हिडीओ शूट केला आहे. आज एक साधारण व्यक्ती कष्टाने पैसे कमवतो आणि ताज हॉटेलमध्ये जेवायला येतो. मात्र तरीदेखील सामान्य माणसाला ताज हॉटेलमध्ये अपमानित केले जाते. माझी चुक काय आहे? मी मांडी घालून जेवायला बसले ही माझी चुक आहे का? असा सवाल त्यांनी या व्हिडीओमध्ये विचारला आहे.
एक आम इंसान, जो मेहनत करके, अपना पैसा कमा कर, अपनी इज़्ज़त के साथ ताज होटल में आता है — उसे आज भी इस देश में ज़लील और अपमानित होना पड़ता है। और मेरी गलती क्या है? सिर्फ़ ये कि मैं बैठ गई एक “regular padmasana style” में? क्या ये मेरी गलती है कि ताज मुझे सिखा रहा है कि कैसे बैठना… pic.twitter.com/vKBYjg8ltb
— Shradha Sharma (@SharmaShradha) October 21, 2025
रेस्टॉरंटमध्ये मांडी घालून बसणे हे…
मी पायात कोल्हापुरी चप्पल घातलेली आहे. ती चप्पलदेखील माझ्या मेहनतीचीच आहे. मात्र मला ताज हॉटेलचा स्टाफ पाय खाली करून बसा, असे सांगत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे, असे मतही श्रद्धा शर्मा यांनी व्यक्त केले. दरम्यान, शर्मा यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेस्टॉरंटमध्ये मांडी घालून बसणे हे शिष्टाचाराला धरून नाही. मांडी घालून बसण्याने लोकांना अस्वच्छ वाटू शकते. यात काहीही चुकीचे नाही, असे मत काही लोकांनी व्यक्त केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी शर्मा यांना पाठिंबा दर्शवला आहे. ताज हॉटेलच्या प्रशासनाने मात्र यावर अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
