AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्यार्थ्याने अंडरगारमेंटमध्ये लपवलेले सिम कार्ड अन् मागच्या वर्षीचा पेपर…Neet पुर्नपरीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार

21 जूनची पुनर्नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीपासून सुरक्षित राहावी यासाठी एजन्सी आणि सरकारने योग्य ती खऱ असताना, वाराणसीमधील कॉपीच्या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. वाराणसीतील हरिश्चंद्र पीजी कॉलेजच्या परीक्षा केंद्रात प्रवेश करणाऱ्या एका उमेदवाराला ताब्यात घेण्यात आले.

विद्यार्थ्याने अंडरगारमेंटमध्ये लपवलेले सिम कार्ड अन् मागच्या वर्षीचा पेपर...Neet पुर्नपरीक्षेदरम्यान धक्कादायक प्रकार
neet re exam
| Updated on: Jun 22, 2026 | 2:22 PM
Share

वाराणसीतील हरिश्चंद्र पीजी कॉलेजच्या परीक्षा केंद्रावर नीट पुर्नपरीक्षेदरम्यान एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यावेळी देशभरातून तब्बल 22 लाख विद्यार्थी परिक्षेला बसले होते. कडक सुरक्षा व्यवस्था असूनही, परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी तपासणीदरम्यान एक उमेदवार आपल्याला अंतर्वस्त्रांत सिम कार्ड लपवलेले होते आणि मागील वर्षीचा नीटचा पेपरही आढळला. या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर खळबळ उडाली असून, सुरक्षा यंत्रणांनी तपास सुरू केला आहे. वाराणसीत असलेले हरिश्चंद्र पीजी कॉलेज हे नीट यूजी परीक्षेचे केंद्र म्हणून निश्चित करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थी परीक्षेसाठी प्रवेश करत असताना आणि तपासणी प्रक्रियेदरम्यान, पोलिसांच्या लक्षात एका उमेदवाराचे संशयास्पद वर्तन आले. संशय आल्याने, पोलिसांनी त्याची कसून झडती घेतली आणि त्याच्या कपड्यांमधून एक सिम कार्ड व मागील वर्षाची नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका जप्त केली. हे एक डिजिटल संवाद उपकरण असू शकते, ज्याचा वापर कॉपी करण्यासाठी केला जाऊ शकतो, असा संशय आहे.

संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर, वाराणसी कोतवाली पोलिसांनी त्याला तात्काळ पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी उमेदवाराकडून जप्त केलेले उपकरण आणि प्रश्नपत्रिका जप्त करून त्याची चौकशी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीदरम्यान, ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्याने स्वतःची ओळख बलिया जिल्ह्यातील रहिवासी प्रिन्स दुबे अशी सांगितली.

मात्र, आरोपी विद्यार्थी ते उपकरण घेऊन परीक्षा केंद्रावर कसा पोहोचला, याचा पोलीस आता सखोल तपास करत आहेत. तो परीक्षा केंद्रावर एकटाच होता की त्याचे इतर साथीदारही केंद्रात आले होते, हे देखील ते निश्चित करण्याचा प्रयत्न करत आहेत. दुबेने पोलिसांना सांगितले की, तो NEET परिक्षेची तयारी करण्यासाठी मध्य प्रदेशातील जबलपूर येथे राहत होता आणि विशेषतः परीक्षा देण्यासाठी वाराणसीला आला होता.

यापूर्वी 3 मे रोजी झालेली परीक्षा पेपरफुटीमुळे परिक्षा रद्द करण्यात आली होती. या घटनेने देशभरात मोठा असंतोप निर्माण झाला होता. त्यावरून मोठा राजकीय वादही पेटला आणि केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली होती.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा