साप पुन्हा तुमच्या घरात कधीच येणार नाही, फक्त 50 रुपये खर्च, सर्वांना माहिती असावी अशी सोपी ट्रीक
सापाचं नुसतं नाव ऐकलं तरी देखील आपल्याला भीती वाटते, साप दिसला तर मग विचारूच नका. मात्र अवघ्या 50 रुपयांमध्ये तुम्ही घरी असं जुगाड तयार करू शकता, ज्यामुळे साप कधीच तुमच्या घरात येणार नाही.

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आहेत, मात्र त्यातील काहीच प्रजाती या विषारी आहेत, इतर सापांच्या प्रजातीपासून मानवाला तेवढा धोका नाही, मात्र सापांबद्दल असे काही गैरसमज पसरवण्यात आले आहेत, त्यामुळे साप दिसताच भीतीने आपल्या अंगावर काटा उभा राहातो आणि आपण त्या सापांना मारण्याचा विचार करतो. मात्र असं न करता जर कुठे आपल्या घरात साप निघाला तर सर्पमित्रांना बोलावलं पाहिजे, ते या सापांना पकडून सुरक्षित आधिवासात सोडतील. दरम्यान विषारी सापांबद्दल बोलायचं झाल्यास भारतामध्ये केवळ चारच प्रजाती अशा आहेत, ज्या की अतिशय विषारी आहेत, ज्यांना आपण बिग फोर असं देखील म्हणतो. ज्यामध्ये कोब्रा, फुरसे, मण्यार आणि घोणस या सापांचा समावेश होतो, तर इतर अनेक बिनविषारी साप आपल्या आजूबाजूला आढळून येतात. दरम्यान साप घरात येऊच नये यासाठी आता वैज्ञानिकांनी एक भन्नाट उपकरण शोधून काढलं आहे, ज्यांच्या माध्यमातून तुम्ही दर महिन्याला फक्त 50 रुपये खर्च करून तुमचं आणि तुमच्या कुटुंबांचं सापांपासून संरक्षण करू शकता.
या छोट्याशा उपकरणाचा शोध बिहार विद्यापीठच्या विज्ञान शाखेचे माजी डीन प्रोप्रेसर मनेंद्र कुमार आणि झुऑलॉजी विभागाचे प्राध्यापक ब्रजकिशोर प्रसाद सिंह यांनी लावला आहे, याला स्नेक डिटेक्ट बॅरिअर असं नाव देण्यात आलं आहे. या उपकरणाचं पेटेंट देखील त्यांनी मिळवलं आहे. या स्रेक डिटेक्टरचं महत्त्वाचं वैशिष्ट म्हणजे हे उपकरण द्विस्थरीय आहे, हे उपकरण गंजरोधक धातू पसून बनवण्यात आलं असून, हे उपकरण साधारण पिंजऱ्याच्या आकाराचं आहे, या दोन कप्प्याच्या पिंजऱ्यामध्ये वरच्या कप्प्यात 300 ग्रॅम खडे किंवा वाळू टाकलेली असते, त्यामध्ये वीस मिली कार्बोलिक अॅसिड तसेच लवंग आणि सिट्रोनेला तेलाचे मिश्रण टाकले जाते. महिनाभर या मिश्रणाची रासायनिक प्रक्रिया सुरू राहते, आणि त्यातून जो तीव्र वास बाहेर येतो, त्यामुळे साप हे उपकरण ज्या घरात ठेवलं आहे, त्याच्या आसपास देखील फिरकत नाहीत.
जर तुम्ही हे उपकरण एकदा खरेदी केलं, त्यानंतर तुम्हाला दर महिन्याला फक्त लवंगा, सिट्रोनेला तेल आणि कार्बोलिक अॅसिड या तीनच गोष्टी खरेदी करण्याची गरज असते, ज्या की तुम्हाला बाजारात 50 रुपयांपेक्षाही कमी किंमतीमध्ये मिळतील आणि साप चुकूनही तुमच्या घरात येणार नाही.
