AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर सोनम वांगचूक यांनी अस्त्र बाहेर काढलं, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात…थेट घोषणाच केली!

उद्यापर्यंत ताब्यात घेतलेल्या नेत्यांना सोडले नाही, तर आपल्याला उपोषण किंवा पदयात्रेचा मार्ग पत्करण्यास भाग पाडले जाईल, असा कडक इशारा वांगचुक यांनी दिला आहे.

अखेर सोनम वांगचूक यांनी अस्त्र बाहेर काढलं, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात...थेट घोषणाच केली!
sonam wangchukImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 10, 2026 | 6:47 PM
Share

CJP Delhi Protest : देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर हे आंदोलन नियोजित आहे. परंतु सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना दिल्लीच्या विमानतळावरच ताब्यात घेण्यात आले आहे. सोबतच विरोधी बाकावरील अनेक बड्या नेत्यांनाही पोलिसांनी जंतर-मंतरवर जाण्याआधीच ताब्यात घेतले आहे. अभिजीत दीपके पोलिसांच्या ताब्यात असल्याने आता या आंदोलनाचे नेतृत्त्व सीजेपीचाच भाग असलेले अजिंक्य शिंदे हे करत आहेत. काहीही झालं तरीही हे आंदोलन सुरूच राहील असा आक्रमक पवित्रा शिंदे यांनी घेतलाय. दरम्यान एकीकडे सीजेपीने ज्ञानेश कु्मार यांच्या राजीनाम्यासाठी रान उठवलेले असताना आता पर्यावरणवादी आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक अॅक्टिव्ह झाले आहेत. त्यांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे सत्ताधाऱ्यांचे तसेच पोलीस यंत्रणांचे धाबे दणाणले आहे.

तर मी पुन्हा उपोषणाला बसणार

याआधी धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा घेण्यासाठी सीजेपीन आणि सोनम वांगचूक यांनी एकत्र आंदोलन केले होते. वांगचूक यांनी केलेल्या उपोषणामुळेच सरकावर दबाव आला. आता पुन्हा एकदा सीजेपीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन उभे केलेय. याच आंदोलनावर बोलताना वांगचूक यांनी महत्त्वाचे भाष्य केले. त्यांनी सरकारला उपोषण किंवा पदयात्रेचा इशारा दिलाय. सोबतच देश आता अघोषित आणीबाणीच्या छायेखाली असल्याचाही थेट आरोप त्यांनी केलाय.

सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त

देशातील सर्वात मोठी लोकशाही सध्या अघोषित आणीबाणीच्या परिस्थितीत आहे. आजच्या आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी अनेक नेते पुढे आले होते. हे पाहून मला आनंद झाला होता. मात्र त्या सर्व नेत्यांना अटक करण्यात आली, असे म्हणत त्यांनी पोलिसांच्या तसेच सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

उद्यापर्यंत सर्वांना न सोडल्यास…

आंदोलनादरम्यान अटक करण्यात आलेल्या सर्व नेत्यांची लवकरात लवकर सुटका करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. जर उद्यापर्यंत या नेत्यांना सोडले नाही, तर आपल्याला उपोषण किंवा पदयात्रेचा मार्ग पत्करण्यास भाग पाडले जाईल, असा कडक इशारा वांगचुक यांनी दिला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे