AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kangana Ranaut vs Sourav Das : ‘मी हृतिक रोशन सारखा दिसतो म्हणून कंगना राणौत माझ्या..’, CJP च्या सौरव दासचा सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी वार

Kangana Ranaut vs Sourav Das :सध्या मीडियामध्ये अभिनेत्री कंगना राणौत आणि कॉकरोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दास यांच्यात जोरदार शाब्दीक लढाई सुरु आहे. सौरव दासने आता कंगनावर पर्सनला अटॅक केला आहे. त्यामुळे ही लढाई अजून तीव्र होईल असं दिसतय.

Kangana Ranaut vs Sourav Das : 'मी हृतिक रोशन सारखा दिसतो म्हणून कंगना राणौत माझ्या..', CJP च्या सौरव दासचा सर्वात जास्त लागेल अशा ठिकाणी वार
Kangana Ranaut vs Sourav DasImage Credit source: PTI
| Updated on: Jul 30, 2026 | 8:00 AM
Share

दिल्लीत जंतर-मंतरवरील विद्यार्थी आंदोलन संपलं आहे. पण आता अभिनेत्री कंगना राणौत आणि कॉकरोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दास यांच्यात वादाचा दुसरा अंक सुरु झाला आहे. कंगनाने नुकतचं जेन झी आंदोलकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरुन सौरव दास आणि कंगना राणौत यांच्यात वाद पेटला आहे. कंगना जेन झी ना ‘गटर जनरेशन’ बोलली. सौरव दासने यावरुन कंगना राणौतला उत्तर दिलं. ‘माझे मित्र मला बोलतात की, मी तरुणपणीच्या हृतिक रोशन सारखा दिसतो, म्हणून कंगना माझ्या मागे लागली आहे’ असं सौरव दास म्हणाला. सौरव दासने असं बोलून कंगना राणौतवर व्यक्तीगत हल्लाबोल केला आहे. कारण कंगना आणि हृतिक रोशन यांच्यात प्रेमसंबंध होते. कंगना सुद्धा जाहीरपणे या बद्दल बोलली आहे.

कंगना राणौतच्या शब्दांमध्ये मला हताशा दिसते तसच मानसिक दृष्टया स्थिर नसलेली व्यक्ती अशा प्रकारे बोलते” असं सौरव दासने टीका करताना म्हटलं आहे. पत्रकार बरखा दत्ता यांच्या ‘द मोजो स्टोरी’मध्ये बोलताना सौरव दास म्हणाला की, “माझ्या मनात कंगना राणौत बद्दल कुठलीही व्यक्तीगत द्वेषाची भावना नाहीय, उलट कंगनानेच हा वाद व्यक्तीगत पातळीवर नेला” “हे बघा, माझ्या मनात कंगनाबद्दल कुठलाही व्यक्तीगत राग नाहीय. तिने जेन झी बद्दल पर्सनल शेरेबाजी केली आणि आता माझ्यावर बोलत आहेत. मी माझ्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कंगनाला शांत राहण्याचा सल्ला दिला आहे” असं सौरव म्हणाला.

या देशातील येणाऱ्या पिढीबद्दल बोलण्याआधी विचार करा

“या देशात प्रॉब्लेम हा आहे की, लोक आता बोलत नाहीत. फार कमी विचार करतात. वाद-विवाद होत नाहीत. त्यामुळे आपण एका मर्यादेत राहून लोकांशी बोललं पाहिजे. हेच मी कंगना राणौत यांना सांगेन” असं सौरव दास म्हणाला. सौरव दासने कंगना राणौतला टोलाही लगावला. “माझे मित्र मला मेसेज करतायत, ती आता तुझ्या जीवाच्या मागे का लागलीय?. त्यातल्या एकाने म्हटलं मी तरुणपणीच्या हृतिक रोशनसारखा दिसतो. काहीही असो, मी एवढच म्हणेन की, शब्द जपून वापरा. हताश आहात असं वाटू नये” असं सौरव दास या मुलाखतीत म्हणाला. “कंगना खूप हताश वाटत आहे. मानसिक दृष्ट्‍या स्थिर असलेल्या माणसाचे हे शब्द, वाक्य वाटत नाहीत. मी त्यांना एवढच म्हणेन की, या देशातील येणाऱ्या पिढीबद्दल बोलण्याआधी विचार करा”

Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा