AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्पाइसजेटची खास ऑफर, जाणून घ्या सर्व माहिती

स्पाइसजेटने कोरोनाच्या या काळात चांगली सेवा देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यासह प्रवाशांचे आरोग्य लक्षात घेऊन सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. स्पाइसजेटकडून ही ऑफर देण्यात येत आहे. (SpiceJet's special offer for corona positive patients, know the detailed)

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी स्पाइसजेटची खास ऑफर, जाणून घ्या सर्व माहिती
आता विमानात बसून बुक करता येणार टॅक्सी, या विमान कंपनीने सुरू केली ही सेवा
| Updated on: May 04, 2021 | 5:39 PM
Share

नवी दिल्ली : कोरोना विषाणूचा कहर सुरूच आहे. देशाच्या प्रत्येक भागात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत आहे. संसर्ग होण्याच्या संख्येत वाढ होत असताना, बर्‍याच अडचणी देखील आहेत. दरम्यान, स्पाइसजेटने कोरोना संक्रमित लोकांसाठी खास ऑफर सुरु केली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या लोकांच्या मदतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या ऑफरमध्ये स्पाइसजेट कोरोना विषाणूची लागण झालेल्या आपल्या ग्राहकांना सुविधा देत आहे. स्पाइसजेटने कोरोनाच्या या काळात चांगली सेवा देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. यासह प्रवाशांचे आरोग्य लक्षात घेऊन सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. स्पाइसजेटकडून ही ऑफर देण्यात येत आहे. (SpiceJet’s special offer for corona positive patients, know the detailed)

काय आहे ऑफर?

कोविड -19 मध्ये संक्रमित झालेल्या लोकांसाठी ही ऑफर सुरू केली आहे. ज्यांनी स्पाइसजेटचे फ्लाइट तिकीट आरक्षित केले होते आणि जर त्यांचा आरटी-पीसीआर अहवाल प्रवासापूर्वी सकारात्मक आला असेल तर ते लोक या ऑफरचा लाभ घेऊ शकतात. या ऑफरचा फायदा त्या प्रवाशांना होईल, जे कोरोना संक्रमित झाल्यामुळे वेळेवर प्रवास करण्यास असमर्थ आहेत, म्हणजेच तुम्हाला तिकीट मिळण्याआधीच तुम्हाला संसर्ग झाला असेल.

या ऑफरमध्ये या लोकांना आपल्या प्रवासाची तारीख पुढे ढकलण्याची संधी दिली जात आहे. कोरोना संसर्ग झाल्यास प्रवासी आपले तिकिट विना शुल्क पोस्टपोंड करू शकतात आणि त्या दिवसाच्या आधी कधीही प्रवास करू शकतात. आपल्याला यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही आणि आपण कोणत्याही शुल्काशिवाय तिकिटाची तारीख रिशेड्युल निश्चित करू शकता. याचा फायदा आपण 15 मे 2021 पर्यंत घेऊ शकता.

यासाठी कोणत्या अटी आहेत?

ही ऑफर केवळ देशांतर्गत प्रवासासाठी आहे. या ऑफरचा लाभ एकदाच घेता येईल. मात्र, यानंतर तिकिट भाड्याचे अतिरिक्त पैसे केवळ प्रवाशांना द्यावे लागणार आहेत. ही ऑफर फक्त कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीलाच मिळू शकेल. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना free.change@spicejet.com वर मेल करावा लागेल. यानंतर, प्रवाशांना आपली सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.

यापूर्वी देखील दिली होती ऑफर?

यापूर्वीही स्पाइसजेटने ऑफर दिली होती, त्यामध्ये सर्व प्रवाशांना तिकिट रिशेड्युल करण्यास सांगितले होते. त्यावेळीसुद्धा स्पाइसजेटने सर्व प्रवाशांना विनामूल्य तारीख रिशेड्युल करण्याची संधी दिली होती. (SpiceJet’s special offer for corona positive patients, know the detailed)

इतर बातम्या

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धाबे दणाणले, तिसरी लाट कशी असेल?; जगाची तयारी काय? वाचा सविस्तर

राज्यात ऑक्सिजनची मागणी वाढतेय, पुरवठा 200 मेट्रिक टनने वाढवा, राज्याची केंद्र सरकारकडे मागणी

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.