कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धाबे दणाणले, तिसरी लाट कशी असेल?; जगाची तयारी काय? वाचा सविस्तर

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल आहे. मात्र जगभरातील अनेक देश कोरोनाची दुसरी लाट झेलून तिसऱ्या लाटेला थोपवण्याची तयारी करताहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धाबे दणाणले, तिसरी लाट कशी असेल?; जगाची तयारी काय? वाचा सविस्तर
Follow us
| Updated on: May 04, 2021 | 4:47 PM

मुंबई : भारतात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल आहे. मात्र जगभरातील अनेक देश कोरोनाची दुसरी लाट झेलून तिसऱ्या लाटेला थोपवण्याची तयारी करत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतातील आरोग्य व्यवस्था कोलमडल्याची स्थिती पाहायला मिळतेय. आहे नाही, तो सगळा ऑक्सिजन पुरवूनही रुग्णांना ऑक्सिजन कमी पडतोय. रेमडेसिवीर सारख्या औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. स्मशानांमध्ये गर्दी मृतदेहांची गर्दी होतेय. महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लावावा लागला आहे. त्यातच आता तिसऱ्या लाटेची बातमी आली आहे. (world under fear of Third wave of CoronaVirus)

कोरोनाची तिसरी लाट आहे तरी काय?

कोरोनाचा हा नवा प्रकार आहे. ज्याला B117 म्हटलं गेलं आहे. हे म्युटेशन पहिल्यांचा ब्रिटनमध्ये सापडलं होतं. तज्ज्ञांच्या माहितीनुसार मूळ कोरोना विषाणूपेक्षा हा 50 टक्के अधिक संक्रमण पसरवू शकतो. शिवाय कोरोनाहूनही अधिक जीवघेणा आहे. आत्तापासूनच याला थोपवण्याची तयारी केली नाही, तर गंभीर परिणाम भोगावे लागतील, असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

जर्मनीची स्थिती बिकट

जर्मनीत कोरोनाची तिसरी लाट आली आहे, तिथे दररोज सरासरी 29 हजार नवे रुग्ण आढळत आहेत. 15 ते 49 वयोगटातील लोकांमध्ये सर्वाधिक संक्रमण सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. म्हणजेच तरुण तिसऱ्या लाटेला अधिक बळी पडत आहेत. त्याचबरोबर वयोवृद्धांच्या मृत्यूच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आतापर्यंत जर्मनीत 80 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

फ्रान्समध्ये 1 कोटी नागरिकांना लस

फ्रांन्समध्ये तिसरा लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याचसोबत लसीकरणाचं कामही जोरात सुरु आहे. आतापर्यंत 1 कोटी लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

नेदरलँडमधील संक्रमणामत 35% टक्के वाढ 

नेदरलँडमध्ये कोरोना संक्रमणामध्ये 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. हेच पाहता डच सरकार कुठल्याही प्रकारे लॉकडाऊन हटवण्यास तयार नाही. इथं कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

तिसऱ्या लाटेसाठी सज्ज होणं गरजेचं

दुसऱ्या लाटेला थोपवून, तिसऱ्या लाटेची तयारी करणं भारतासाठी अत्यंत गरजेचं आहे. पुन्हा सगळं सुस्थितीत आणायचं असेल तर मोठ्या प्रमाणात लसीकरण आणि आहेत त्या रुग्णांना बरं करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत हे होत नाही, तोवर कडक लॉकडाऊनची गरज आता तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

संबंधित बातम्या

तिसऱ्या लाटेचा सामना करावाच लागणार, वीकेंड लॉकडाऊन, नाईट कर्फ्यू बिनकामाचे; डॉ. गुलेरिया यांचा इशारा

कोरोनामुळे अंडरवर्ल्डचंही ‘एन्काऊंटर’; अनेक गँगस्टर, कुविख्यात कैद्यांची टरकली

हैदराबादेतील प्राणी संग्रहालयात 8 सिंहांना कोरोनाची लागण, भारतातील पहिलंच प्रकरण!

(world under fear of Third wave of CoronaVirus)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.