AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Success Story: सेरेब्रल पाल्सीवर मात करत मिळवला IIT मद्रासमध्ये प्रवेश; वाचा रिक्षाचालकाच्या मुलाची प्रेरणादायी कथा!

चेन्नईच्या 17 वर्षीय दिव्यांग जे संतोष विद्यार्थ्याची प्रेरणादायी कथा सोशल मीडियावर चर्चेत आहे. जन्मजात 90 टक्के दिव्यांगत्व असूनही त्याने आयआयटी मद्रासच्या डेटा सायन्स आणि एप्लिकेशन या नामांकित चार वर्षाच्या बीएस कोर्समध्ये प्रवेश मिळवला आहे.

Success Story: सेरेब्रल पाल्सीवर मात करत मिळवला IIT मद्रासमध्ये प्रवेश; वाचा रिक्षाचालकाच्या मुलाची प्रेरणादायी कथा!
Success Story: सेरेब्रल पाल्सीवर मात करत मिळवला IIT मद्रासमध्ये प्रवेश; वाचा रिक्षाचालकाच्या मुलाची प्रेरणादायी कथा!
| Updated on: Sep 03, 2026 | 7:30 PM
Share

‘इच्छा तिथे मार्ग’ ही म्हण तामिळनाडूतील एका 17 वर्षांच्या मुलाने सत्यात उतरवली आहे. जन्मापासून 90 टक्के स्पायनल मस्क्युलर डिसॅबिलिटी आणि सेरेब्रल पाल्सी असूनही मद्रासच्या डेटा सायन्स अँड एप्लिकेशनमधील चार वर्षांच्या बॅचलर ऑफ सायन्स अभ्यासक्रमात प्रवेश मिळवला आहे. आयआयटी मद्रासच्या या कोर्सला थेट प्रवेश मिळत नाही, तर त्यासाठी पात्रता परीक्षा पास करावी लागते. संतोष पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला, पण त्याने हार मानली नाही. त्याने पुन्हा जोमाने अभ्यास केला आणि दुसऱ्या प्रयत्नात ही परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण करून दाखवली. खरं तर गेल्या वर्षी संतोषची आयआयटी मद्रासची सहल हुकली होती. त्यामुळे संतोष हिरमुसला होता. पण त्याने मनाशी ठाम केलं की एक दिवस आयआयटी मद्रासमध्ये जायचं. यासाठी जोमदार तयारी केली आणि स्वप्त सत्यात उतरवलं.  त्याने शारीरिक आणि आर्थिक परिस्थितीवर मात करून यश संपादन केलं आहे.

संतोषचे वडील चेन्नईमध्ये ऑटो रिक्षा चालवून घराचा गाडा हाकतात. घरची आर्थिक परिस्थिती बेताची आणि 90 टक्के दिव्यांगत्व असताना त्याने हे यश मिळवल्याने कौतुक होत आहे.  संतोष हा त्याच्या वर्गातील एकमेव विद्यार्थी आहे ज्याला आयआयटी मद्रासच्या बॅचलर ऑफ सायन्स अभ्यासक्रमात प्रवेश मिळाला आहे. आयआयटी मद्रासने सुरू केलेल्या कोर्सबद्दल त्याला एका स्वयंसेवी संस्थेकडून माहिती मिळाली होती. हा कोर्स घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने शिकता येत असल्याने त्याला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही. संतोषचे हे यश पाहून आयआयटी मद्रास आणि ‘TN Volunteers’ ही स्वयंसेवी संस्था त्याच्या मदतीसाठी पुढे आली आहे.

“‘आयआयटी-एम फॉर ऑल’ या उपक्रमांतर्गत, त्याला सुरुवातीच्या टप्प्यात एआय प्रशिक्षणासह टीएन स्वयंसेवकांकडून प्रत्यक्ष मदत मिळेल, तसेच ते त्याच्या पहिल्या वर्षाच्या शिक्षण शुल्काचा खर्चही उचलतील,” असे आयआयटी मद्रासने सांगितले.

Follow Us
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा...
तब्बल 3,182 क्युसेकने सोडणार पाणी; महाराष्ट्रातील कोयना धरणात मोठा विसर्ग
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
सरकारी पैशांतून राजकीय अजेंडा राबवला जातोय, बड्या नेत्याचा गंभीर आरोप
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
नाशिकमधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाला अभिजीत दीपके यांची भेट
थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन
थेट रस्त्यावर आंधोळ करून निषेध; नवी मुंबईतील नागरिकांचे अजब आंदोलन
पुण्यातील गणेशोत्सवातील साऊंड सिस्टीम वाद: मंडळांची भूमिका
पुण्यातील गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषण वाद: मंडळांची भूमिका आणि बापटांच्या भूमिकेवरील प्रश्नचिन्ह
विद्यानंद बापट: लाऊडस्पीकरवरील वाद, पुण्यातील ध्वनिप्रदूषणावर हल्लाबोल
विद्यानंद बापट यांचा लाऊडस्पीकरविरोधात हल्लाबोल:
मराठा आरक्षण: १९९४ च्या निर्णयावरुन विखे पाटील-शरद पवार वाद
मंडल आयोगावरून विखे पाटील आणि शरद पवार यांच्यात मराठा आरक्षणावरुन राजकीय संघर्ष