AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! एनडीएमध्ये फूट; दोन प्रमुख पक्षांनी केली मोठी घोषणा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि भाजपला मोठा धक्का बसला आहे, दोन प्रमुख पक्षांनी मोठी घोषणा केली आहे.

मोठी बातमी! एनडीएमध्ये फूट; दोन प्रमुख पक्षांनी केली मोठी घोषणा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 26, 2025 | 4:26 PM
Share

एनडीएला उत्तर प्रदेशमध्ये मोठा धक्का बसला आहे, एनडीएचे प्रमुख घटक पक्ष असलेले दोन पक्ष अपना दल (एस) आणि निषाद पार्टी यांनी मोठी घोषणा केली आहे. आगामी काळात उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय या दोन पक्षांनी घेतला आहे. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या अपना दल (एस) ने याबाबत आधी घोषणा केली, त्यानंतर निषाद पार्टीने देखील या संदर्भात घोषणा केली आहे. या दोन पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे.

एनडीएच्या या दोन प्रमुख घटक पक्षांनी घेतलेला हा निर्णय भाजपसाठी चिंतेचं कारण बनला आहे, कारण घोषणा करेपर्यंत याबाबत भाजपला या संदर्भात कोणतीही माहिती नव्हती. त्यामुळे आता एनडीमध्ये सर्व आलबेल आहे का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. अपना दल एस आणि निषाद पार्टीचा हा निर्णय एनडीएसाठी मोठा धक्का असल्याचं मानलं जातं आहे.

यावर आता भाजप नेते आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. मित्र पक्षांनी एकतर्फी निर्णय घेतला आहे, आशा एकतर्फी निर्णयांवर भाजपच्या पातळीवर अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाहीये, तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो, मात्र या संदर्भात कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही असं केशव प्रसाद मौर्य यांनी म्हटलं आहे.

अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल

मौर्य यांनी म्हटलं की, अजून स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत कोणताही निर्णय झालेला नाही, निवडणुका स्वबळावर लढायच्या की सर्वांना सोबत घेऊन लढायच्या याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. अखिलेश यादव मुंगेरीलाल के हसीन सपने पाहत आहेत, 2022 मध्ये त्यांनी 400 जागांवर दावा केला होता, पण 100 जागाच मिळाल्या, 2027 मध्ये समाजवादी पार्टी ‘समाप्तवादी पार्टी’ होईल असं मौर्य यांनी म्हटलं आहे.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी