केरळच्या कोच्चि विद्यापीठात आयोजित म्युजिक कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, चौघांचा मृत्यू

केरळच्या कोच्चि विद्यापीठात म्युजिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत 4 जणांचा मृत्यू झालाय.

केरळच्या कोच्चि विद्यापीठात आयोजित म्युजिक कॉन्सर्टमध्ये चेंगराचेंगरी, चौघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: Nov 25, 2023 | 9:22 PM

कोच्चि | 25 नोव्हेंबर 2023 : केरळच्या कोच्चि विद्यापीठात म्युजिक कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं. या कार्यक्रमावेळी चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे. या चेंगराचेंगरीत 4 जणांचा मृत्यू झालाय. गायिका निकिता गांधी गाणं गात असताना चेंगराचेंगरीची घटना घडली. हा कार्यक्रम विद्यापीठातील ओपन-एयर ऑडिटोरियममध्ये सुरु होता. यावेळी ही घटना घडलीय. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ओपन-एयर ऑडिटोरियममध्ये कार्यक्रम सुरु होता. यावेळी अचानक पाऊस सुरु झाला. त्यामुळे कार्यक्रमात उपस्थित असणारे प्रेक्षक आतमध्ये सभागृहाच्या दिशेला पळाले. अचानक पाऊस सुरु झाल्याने प्रेक्षकांची भंबेरी उडाली. प्रेक्षक सैरावैरा सभागृहाच्या दिशेला पळाले. यामुळे मोठा गदारोळ झाला. चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली.

या घटनेत दोन विद्यार्थी आणि दोन विद्यार्थीनींचा मृत्यू झाला. तसेच तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. या चेंगराचेंगरीत 15 विद्यार्थी बेशुद्ध झाले आहेत. या घटनेत ज्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झालाय त्यांना कलामासेरी मेडिकल कॉलेजला नेण्यात आलंय. संबंधित घटना आज संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. विद्यापीठाचा टेक फेस्टचा आज शेवटचा दिवस होता.

'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे
'संजय राऊतांची प्रतिक्रिया आश्चर्यकारक..', थेट पवार कुटुंबातूनच फटकारे.
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री
शिंदे काय बोलले की एका वाक्यानं थेट 'आपत्ती व्यवस्थापन समिती'त एन्ट्री.
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?
'आव्हाडांना फक्त रॉकेल टाकायचाच धंदा...', धस भडकले, कशावरून जुंपली?.
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?
बँकॉक फ्लाईट... एका फोननं गल्ली-दिल्लीपर्यंत सारी यंत्रणा टाईट?.
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले
शिंदेंसारखा आतंरराष्ट्रीय दलाल पवारांसोबत, त्या सत्कारावरून राऊत भडकले.
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी
स्टारडम सोडून अध्यात्माकडे वळले 'हे' सेलिब्रिटी.
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता...
पुणे विद्यापीठातील 2 धक्कादायक घटना समोर, एकाला उंदीर चावला तर आता....
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय
कॉपी करणाऱ्यांचं आता काही खरं नाही, कारण...परीक्षेबाबत CM मोठा निर्णय.
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली
तुम्हाला मीडियाचा M माहीत नव्हता, तेव्हापासून; आव्हाड-धसांमध्ये जुंपली.
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?
एक मेसेज, फोन बंद, तानाजी सावंतांचा मुलगा बेपत्ता,न सांगता कुठे गेला?.