AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयआयटीत शिक्षण, तरीही भीक मागण्याची वेळ, मध्यप्रदेशच्या आजोबाची चटका लावणारी कहाणी

आयआयटीचं शिक्षण घेतलेल्या एका आजोबांना रस्त्यांवर भीक मागावी लागली (story of 90 year old IITian who beg in Madhya Pradesh)

आयआयटीत शिक्षण, तरीही भीक मागण्याची वेळ, मध्यप्रदेशच्या आजोबाची चटका लावणारी कहाणी
| Updated on: Dec 08, 2020 | 5:12 PM
Share

भोपाळ : वेळेपेक्षा मोठं कुणीचं नाही, असं म्हणतात ते खरं आहे. वेळ कधी कुणावर कशी येईल याचा कधीच अंदाज लावता येणार नाही. मध्यप्रदेशमध्ये अशाचप्रकारची एक घटना समोर आली आहे. आयआयटीचं शिक्षण घेतलेल्या एका आजोबांना रस्त्यांवर भीक मागावी लागत आहे. आजोबांची मनाला चटका लाऊन जाणारी ही कहानी सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे (story of 90 year old IITian who beg in Madhya Pradesh).

‘टाईम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, मध्यप्रदेशच्या ग्वालियर शहरात 90 वर्षांच्या एका आजोबांवर आयआयटीचं शिक्षण असून भीक मागण्याची वेळ आली आहे. या आजोबांचं नाव सुरेंद्र वशिष्ट असं आहे. ते दररोज बस स्टँडवर बसून भीक मागतात. सुरेंद्र यांच्याबाबतची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्वर्ग सदन या आश्रमने मदतीचा हात पुढे केला आहे.

स्वर्ग सदन हे तेच आश्रम आहे ज्याने काही दिवसांपूर्वी मनीश मिश्रा नावाच्या व्यक्तीला मदत केली होती. मनीश आधी पोलिसात होते. मात्र, उतार वयात त्यांच्यावर भीक मागण्याची वेळ आली. त्यांच्या एका बॅचमेटने त्यांना ओळखलं. त्यानंतर स्वर्ग सदन आश्रमने त्यांना आसरा दिला (story of 90 year old IITian who beg in Madhya Pradesh).

स्वर्ग सदन आश्रमचे सदस्य विकास गोस्वामी यांनी सुरेंद्र वशिष्ट यांच्याविषयी माहिती सांगितली. “सुरेंद्र वशिष्ट यांची इंग्रजी ऐकूण मला धक्काच बसला. त्यांच्यासोबत बातचित केल्यावर माहित पडलं की, त्यांनी आयआयटीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांनी 1969 साली आयआयटी कानपूर येथून मॅकेनिकल इंजीनिअरिंगचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर 1972 साली लखनऊ येथे ‘लॉ’ची मास्टर डिग्री घेतली. सुरेंद्र यांचे वडील जेसी मिलमध्ये सप्लायर म्हणून काम करायचे, अशी देखील त्यांनी माहिती दिली”, असं विकास गोस्वामी यांनी सांगितलं.

हेही वाचा : ‘बिनोद’चा ट्विटरवर पहिला नंबर, या वर्षी ठरला मीम्सचा बादशाहा

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.