युट्यूबवर बघितला वजन कमी करणाऱ्या औषधाचा व्हिडीओ… हे औषध घेताच विद्यार्थीनीचा गेला जीव, थेट..

नुकताच एक धक्कादायक घटना घडली आहे. चक्क युट्युबवरून वजन कमी करण्यासाठी बघितलेले औषध खाल्ल्याने मुलीचा जीव गेला. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

युट्यूबवर बघितला वजन कमी करणाऱ्या औषधाचा व्हिडीओ... हे औषध घेताच विद्यार्थीनीचा गेला जीव, थेट..
Kalaiyarasi
| Updated on: Jan 25, 2026 | 9:56 AM

एक धक्कादाक घटना पुढे आली आहे. युट्यूबवर व्हिडीओ पाहून मुलीने चक्क वजन कमी करण्याचे औषध घेतले आणि तिचा थेट जीव गेला. सध्या वाढलेले वजन कमी करण्यावर अनेकांचा भर दिसत आहे. मग वजन कमी करण्यासाठी फक्त डाएट किंवा व्यायामच नाही तर अनेक उपचार घेतली जातात. बऱ्याचदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय लोक मेडिकलवर जाऊन वजन कमी करण्याची औषधे घेतात. युट्यूब किंवा सोशल मीडियावरील दाव्यावर विश्वास ठेवतात आणि कोणताही विचार न करता थेट औषध घेतली जातात. युट्यूबवरील व्हिडीओ पाहून तामिळनाडूच्या मुलीने औषध घेतले. तिला अपेक्षा होती की, हे औषध घेतल्याने आपले वजन झटपट कमी होईल. मात्र, औषध घेतल्यानंतर तिला प्रचंड त्रास झाला आणि थेट तिचा जीव गेला. कुटुंबियांनी मुलीला त्रास होत असल्याचे पाहून तिला रूग्णालयात दाखल केले पण तिला वाचवण्यात यश आले नाही.

पोलिसांनी या प्रकरणात बोलताना सांगितले की, मदुराईच्या सेलूर जिल्ह्यातील मीनाबलपुरम येथील रहिवासी असलेला कलैयारासी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत होती आणि तिचे वजन थोडे जास्त होते. तिने एका युट्यूब चॅनेलवर केलेल्या दाव्यानंतर एका मेडिकल दुकानातून बोरॅक्स खरेदी केले. तिला वाटले होते की, हे खाल्ल्याने आपले वजन झटपट कमी होईल.

तिने घरी आल्यावर बोरॅक्स खाल्ले. तिच्या कुटुंबियांनी याकरिता तिला अशाप्रकारचे औषधे घेण्यास विरोध केला होता. मात्र, तिने कुटुंबियांचे ऐकले नाही आणि बोरॅक्स खरेदी केले. बोरॅक्स खाल्ल्यानंतर काही वेळातच तिला उलट्यांचा त्रास सुरू झाला. तिला इतक्या जास्त उलट्या झाल्या की, ती घरात बेशुद्ध पडली. कुटुंबियांनी सुरूवातीला खासगी रूग्णालयात दाखल केले. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आली आणि तिला घरी पाठवण्यात आले.

परत रात्री तिला त्रास सुरू झाला. तिची प्रकृती पुन्हा बिघडली तिला मदुराईतील सरकारी राजाजी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला. कलैयारासी हिच्या मृत्यूने मोठी खळबळ उडाली. युट्यूबवर पाहून तिने थेट वजन कमी करण्यासाठी औषध घेतले आणि तेच हिच्या अंगलट आल्याचे बघायला मिळाले.