Sugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम

Sugar Price Hike: देशात साखरेच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखरेच्या आयातीशी संबंधित नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. बाजारातील वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवणे, साखरेची साठेबाजी थांबवणे आणि व्यापाऱ्यांची काळाबाजारी रोखणे हा या कठोर निर्णयाचा मुख्य उद्देश आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Sugar Rate : साखरेच्या वाढत्या किंमती रोखण्यासाठी सरकारने अचानक बदलला हा नियम
| Edited By: | Updated on: Aug 25, 2026 | 11:19 AM

Sugar Price Hike: साखरेच्या गगनाला भिडणाऱ्या किमतींना लगाम घालण्यासाठी सरकारने अचानक आयात नियमावलीत सुधारणा केली आहे. बाजारात साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नफेखोरी करणाऱ्या साठेबाजांवर याद्वारे कडक कारवाई केली जाईल. ग्राहकांना वाजवी दरात साखर उपलब्ध करून देणे आणि काळाबाजार मोडून काढणे हे या नव्या सरकारी नियमांचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

देशात सणासुदीच्या तोंडावर साखरेच्या दरांचा भडका उडाला असून, वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने थेट आयात नियमांमध्ये अचानक मोठे बदल केले आहेत. देशांतर्गत बाजारात साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱ्या साठेबाजांना लगाम घालणे हा या नवीन नियमाचा मुख्य हेतू आहे..

Loading...

जमाखोरीवर धडक ॲक्शन
साखरेची साठेबाजी आणि काळाबाजार रोखण्यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलली आहेत. बाजारात साखरेचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून नफेखोरी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर आणि मोठ्या पुरवठादारांवर कडक नजर ठेवली जात आहे. केंद्र आणि राज्य सरकारांच्या संयुक्त पथकांकडून देशभरातील साखर मिल आणि मोठ्या गोदामांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकार बाजारातील प्रत्येक हालचालीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

साखरेवर लागू करण्यात आलेले नवीन नियम

वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी सरकारने थेट आयात आणि साठा मर्यादेच्या नियमांमध्ये सुधारणा केली आहे. वाणिज्य मंत्रालयाने लागू केलेल्या नवीन नियमांनुसार, परदेशातून आयात केलेली कच्ची साखर भारतात आणल्यानंतर केवळ 2 महिन्यांच्या आत तिचे शुद्धीकरण (Refining) करून देशांतर्गत बाजारात विकावी लागेल. यामुळे व्यापाऱ्यांना आयात केलेली साखर गोदामात दीर्घकाळ साठवून ठेवता येणार नाही.

याव्यतिरिक्त, देशातील साखर व्यापाऱ्यांसाठी 400 टनाची स्टॉक मर्यादा लागू करण्यात आली आहे, जी 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत लागू राहील. तसेच, 1 सप्टेंबर 2026 पासून सॉफ्ट ड्रिंक, मिठाई आणि आईस्क्रीम बनवणाऱ्या मोठ्या ग्राहकांसाठी 15 दिवसांपेक्षा जास्त वापराचा साठा ठेवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच सरकारने 10 लाख टन कच्च्या साखरेच्या विनाशुल्क आयातीलाही मंजुरी दिली आहे.

महिनाभरात एवढी महाग झाली साखर
‘आजतक’च्या वृत्तानुसार, देशात केवळ एका महिन्यात साखरेच्या किमतींमध्ये विक्रमी वाढ झाली आहे. 20 जुलै 2026 रोजी साखरेची सरासरी किरकोळ किंमत 48.18 प्रति किलो होती, जी अवघ्या महिनाभरात म्हणजेच 20 ऑगस्ट 2026 पर्यंत थेट 55.70 प्रति किलोवर पोहोचली. काही स्थानिक बाजारांमध्ये आणि किरकोळ दुकानांमध्ये तर साखरेचे दर प्रति किलो 70 ते 80 पर्यंत गेले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे.

साखर महाग होण्यामागची मुख्य कारणे काय?

हवामानाचा फटका व कमी उत्पादन
अल निनो प्रभाव आणि अतिरिक्त पावसामुळे ऊस पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. देशांतर्गत साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा कमी (अंदाजे 30.6 दशलक्ष टन) झाले आहे.

‘रेड रॉट’ रोगाचा प्रादुर्भाव
उसाच्या पिकावर अचानक पडलेल्या ‘रेड रॉट’ (तांबेरा/कुजणे) या रोगामुळे उसाचे उत्पादन आणि साखरेचा उतारा घटला आहे.

सणासुदीची वाढती मागणी
आगामी रक्षाबंधन, गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांमुळे बाजारपेठेत साखरेची मागणी कमालीची वाढली आहे.

जागतिक बाजारपेठेतील टंचाई
आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचा पुरवठा कमी असल्याने केवळ दोन महिन्यांत जागतिक किमती 16 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

सट्टेबाजी आणि जमाखोरी
काही बड्या व्यापारी कंपन्या आणि साखर कारखान्यांनी साखरेचा साठा करून कृत्रिम टंचाई निर्माण केल्यामुळे दरांमध्ये अचानक मोठी उसळी आली.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us