सर्वोच्च न्यायालयाने पालामुरु-रंगारेड्डी प्रकल्पाबाबत नागम यांची याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी माजी मंत्री नागम जनार्दन रेड्डी यांनी दाखल केलेली याचिका (एसएलपी) फेटाळली.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी माजी मंत्री नागम जनार्दन रेड्डी यांनी दाखल केलेली याचिका (एसएलपी) फेटाळली. पलामुरु-रंगारेड्डी उपसा सिंचन योजनेत (पीआरएलआयएस) आर्थिक अनियमितता असल्याचा आरोप करण्यात या याचिकेत करण्यात आला होता.
कोणतेही योग्य कारण नसल्याचे सांगत याचिका फेटाळली
बुधवारी झालेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने, तेलंगणा उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यासाठी या प्रकरणात कोणतेही योग्य कारण नसल्याचे सांगत याचिका फेटाळली
दोन्ही बाजू ऐकून दिला आदेश
याचिकाकर्त्या डॉ. नागम यांच्या वतीने वरिष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी बाजू मांडली , यावेळेस न्यायालये राज्याच्या प्रत्येक कृतीवर देखरेख करू शकत नाहीत असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL) ची बाजू वरिष्ठ वकील आणि माजी अॅटर्नी जनरल श्री. मुकुल रोहतगी यांनी मांडताना याचिकाकर्ता डॉ. नागम हे गेल्या १० वर्षांपासून उच्च न्यायालय, सीव्हीसी इत्यादींसमोर हेतूपूरस्सर एकामागून एक खटले दाखल करत आहेत , याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले. दोन्ही बाजूंचे म्हणणे सविस्तरपणे ऐकल्यानंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने एसएलपी रद्द करण्याचा आदेश दिला.