
राज्यात तीन वर्षांपूर्वी सत्ता बदल झाला. शिवसेना पक्ष तीन वर्षांपूर्वी फुटला. तेव्हापासून शिवसेना पक्ष कुणाचा? निवडणूक चिन्ह कोणाकडे राहणार? या बद्दलची कायदेशीर लढाई सुरु आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निकाल दिला. आज अधिकृत शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. उद्धव ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल हा खटला लढवत आहेत. आज या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. पण तारीख पे तारीखचा सिलसिला सुरु राहिला. आजची सुनावणी ऐकण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला. पुढची तारीख देतो, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. आम्ही ऑगस्टमधील तारीख देतो असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून आजच सुनावणी घ्या अशी मागणी कोर्टात करण्यात आली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट महिन्यातील तारीख देऊ असं म्हटलेलं आहे. तब्बल दीड वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होत होती. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूका येत आहेत. ऑगस्टमधील तारीख देण्याचा प्रयत्न करुन असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं. ऑक्टोंबर महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ शकतात. ऑगस्टमध्ये तारीख मिळून सुनावणी पूर्ण झाल्यास शिवसेना पक्ष आणि चिन्ह कोणाचं? याचा निर्णय होऊ शकतो
‘आज खूप मोठं विधान’
“शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने आज खूप मोठं विधान केलेलं आहे. आता अर्ज दाखल करणं बंद करा. दोन वर्षापासून हे प्रकरण जे प्रलंबित आहे, त्याचा निकाल त्याची मुख्य सुनावणी आपण ऑगस्टमध्ये घेऊ. कपिल सिब्बल म्हणाले की, तुम्ही ऑगस्टची एक तारखी द्या. जस्टिस सूर्यकांत म्हणाले की, मी माझं रोस्टर बघतो. ऑगस्टच्या सुनावणीची तारीख एक ते दोन दिवसात कळवतो. ऑगस्टमध्ये सुनावणी होईल. निर्णय राखून ठेवला जाईल. ऑगस्टमध्ये सुनावणी झाली, तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये लागू शकतो” असं वकीलाने सुनावणीनंतर सांगितलं.
असिम सरोदे सुनावणीनंतर काय म्हणाले?
“ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल. हस्तक्षेप याचिकेचा उद्देश सफल झालेला आहे. लवकरात लवकर सुनावणी घेतली गेली पाहिजे यासाठी हस्तक्षेप याचिका असते. त्याची कारण दिलेली असतात. त्याचा उपयोग प्रभावीपणे झालेला आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होईल” असं वकिल असिम सरोदे म्हणाले.
“राहुल नार्वेकर यांनी दिलेला आमदार अपात्रतेचा निर्णय आणि चिन्ह या संदर्भातील दोन सुनावण्या ऐकून घेवून सुप्रीम कोर्ट निर्णय देईल. या दोन्ही याचिकांवर आम्ही सुनावणी घेवू अस कोर्टाने सांगितलं आहे. कोर्टाचा हा निर्णय चांगला आहे की ऑगस्ट महिन्यात काही चांगला निर्णय अपेक्षित आहे. ऑगस्ट महिन्यातील तारीख आम्ही देवू अस कोर्टाने सांगितलं आहे” असं असीम सरोदे म्हणाले.
“पाहिल्या आठवड्यात यावर सुनावणी होईल. आम्ही सुप्रीम कोर्टात हे अपील केलं आहे म्हणजे सुनावणी लवकर घ्यावी म्हणून. लर्नड वकील पण अशी रस्त्यावर उभ राहून केल्यासारखी वक्तव्य करत असतील तर काय. पण आजचा निर्णय चांगला आहे. दोन वर्ष सुनावणी होत नव्हती ती आता प्राथमिक सुनावणी होवून ऑगस्ट महिन्यात करू अस कोर्टाने सांगितलं आहे” असं असीम सरोदे म्हणाले.