PM Modi- Sharad Pawar : सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आशीर्वाद द्या, मोदींचा थेट शरद पवारांना फोन, राजकारणात काय घडतंय?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. 'तुम्ही काळजी नका करू, सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू', असे मोदी पवारांना म्हणाले. यामुळे पवारांच्या एनडीए प्रवेशाबाबत राजकीय चर्चांना उधाण आले आहे. तब्येत बरी झाल्यावर पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

PM Modi- Sharad Pawar : सुप्रिया आणि आम्ही देश सांभाळू, आशीर्वाद द्या, मोदींचा थेट शरद पवारांना फोन, राजकारणात काय घडतंय?
| Updated on: Nov 04, 2026 | 12:03 PM

देशातील राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना फोन केला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तुम्ही काळजी करू नका. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू. तुम्ही काळजी घ्या,  तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत राहा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांना म्हटलं आहे. मोदी यांच्या या विधानाचे मोठे राजकीय अर्थ काढले जात आहेत. येत्या काळात शरद पवार एनडीएसोबत जाणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी विठ्ठल मणियार यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवार यांना फोन आला होता. अत्यंत काळजीने आणि प्रेमाने त्यांनी पवारांच्या प्रकृतीची चौकशी केली. तब्येतीची काळजी घेण्याचा सल्लाही दिला. तुम्ही देशासाठी आतापर्यंत काम करत आला आहात. सुप्रिया ताईही चांगलं काम करत आहे. तुम्ही आता आराम करा. सुप्रियाताई आणि आम्ही देश सांभाळू. तब्येतीची काळजी घ्या आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी ठणठणीत राहा, असं मोदी पवारांना म्हणाल्याचं विठ्ठल मणियार याांनी सांगितलं. त्यावर मी तब्येतीची काळजी घेत आहे. तुम्ही सर्व असल्याने मला काही चिंता नाहीये. मी तब्येतीची काळजी घेतो, असं पवारांनी मोदींना सांगितल्याचंही मणियार म्हणाले.

Loading...

पवारांना डिस्चार्ज

दरम्यान, शरद पवार यांच्यावर पुण्याच्या रुबी रुग्णालयात गेल्या दोन दिवसांपासून उपचार सुरू होते. आज त्यांना अखेर डिस्चार्ज देण्यात आला आहे. पवार यांना छातीत कफ झाला होता. तसेच त्यांना थकवा जाणवत होता. त्यामुळे त्यांना रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या विविध चाचण्या करण्यात आल्या होत्या. आज प्रकृती ठिक झाल्याने पवारांना घरी सोडण्यात आलं आहे. रुग्णालयातून पवार बारामतीच्या घरी जातील, अशी चर्चा होती. मात्र, पवार थेट मुंबईला निघाले आहेत. त्यांच्यासोबत सुप्रिया सुळे उपस्थित आहेत. पवार मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानी आराम करणार आहेत. डॉक्टरांनी त्यांना आठ दिवस आराम करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, दिवाळीनंतर शरद पवार हे दुष्काळी भागाचा दौरा करणार असल्याचं सांगितलं जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us