AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Next CJI: कोण असणार नवे सरन्यायाधीश? CJI भूषण गवईंनी सांगितले नाव

Who is next CJI: सरन्यायाधीश गवई हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे सरकारला पुढील सरन्यायाधीश निवडावे लागणार आहेत. यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील सरन्यायाधीश कोण असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Next CJI: कोण असणार नवे सरन्यायाधीश? CJI भूषण गवईंनी सांगितले नाव
Next Cji
| Updated on: Oct 26, 2025 | 10:48 PM
Share

Who is Surya Kant : महाराष्ट्राचे सुपुत्र भूषण गवई हे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश गवई हे 23 नोव्हेंबर 2025 रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे सरकारला पुढील सरन्यायाधीश निवडावे लागणार आहेत. यासाठी सरकारने प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील सरन्यायाधीश कोण असणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. नियमांनुसार सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयांमध्ये सरन्यायाधीशांनंतर सर्वात वरिष्ठ न्यायाधीश हे हे पद भूषवत असतात. यासाठी सध्याचे सरन्यायाधीश नावाची शिफारस करत असतात. आता सीजेआय बी.आर. गवई यांनी नवीन सरन्यायाधीश कोण असतील याची माहिती दिली आहे.

नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस

समोर आलेल्या माहितीनुसार, सरन्यायाधीश भूषण गवई हे सोमवारी नवे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करणार आहेत. भूतान दौऱ्यावर टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना, गवई यांनी सांगितले की, ‘माझ्या कार्यालयाला केंद्र सरकारकडून पुढील सरन्यायाधीशांसाठी शिफारस करण्याबाबत संदेश मिळाला आहे. मी रविवारी दिल्लीत पोहोचेन आणि सोमवारी माझा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नावाची शिफारस करणार आहे.’

कोण आहेत न्यायमूर्ती सूर्यकांत ?

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत हे सध्या वरिष्ठ न्यायाधीश आहेत. सूर्यकांत हे हरियाणातील हिसार येथील रहिवासी आहेत. त्यांचा जन्म मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता, त्यांचे बालपण संयुक्त कुटुंबात गेले. त्यांचे वडील शिक्षक होते. सूर्यकांत यांची मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण गावातील सरकारी शाळेत पूर्ण केले. त्यांनी 1981 मध्ये हिसार येथील सरकारी पदव्युत्तर महाविद्यालयातून पदवी आणि 1984 मध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली.

विविध पदांवर केले काम

सूर्यकांत यांनी न्यायाधीश पदावर येण्यापूर्वी हरियाणाचे महाधिवक्ता म्हणून काम केले. तसेच ते हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशही होते. सूर्यकांत हे राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरणाचे पदसिद्ध कार्यकारी अध्यक्ष आहेत. आता 24 नोव्हेंबर 2025 रोजी न्यायमूर्ती सूर्यकांत पुढील सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

Follow Us
धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा
Dharmendra Pradhan Resign | धर्मेद्र प्रधानांनी पंतप्रधानांना दिलेल्या पत्रात नेमकं काय? राजीनामा देताच...
NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
मोठी बातमी! NEET पेपरफुटी प्रकरणात सरकार झुकलं; धर्मेंद्र प्रधानांनी दिला राजीनामा
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन्....
दिल्लीत मोठ्या घडमोडी! पुन्हा पोलिसांचा आंदोलकांवर लाठीचार्ज अन् जंतर मंतरवर मोठा गोंधळ
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन
गेल्या 12 वर्षात इतकं घाबरवलंय की... अभिजीत दीपके पत्रकार परिषद घेऊन असं काय म्हणाला?
तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? राऊत नेमकं कुणावर भडकले
Sanjay Raut | तीला काय देशाविषयी माहिती? काय देशाविषयी कळतं? संजय राऊत नेमकं कुणावर भडकले?
कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांचा...
Delhi Police PC | कॉक्रोच जनता पार्टीच्या जंतरमंतरवरील आंदोलनाबाबत दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद, थेट...
आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक
Ritu Tawade | आषाढी एकादशीला मुंबईच्या महापौर रितू तावडे यांचा विठुरायाला अभिषेक; वडाळ्यात भाविकांचा जनसागर!
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या...
नीट पेपरफुटीवरून राहुल गांधींचा पुन्हा सरकारवर हल्लाबोल; अशात 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
चांगला पाऊस पडू दे... पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत म्हणाले, रोज...